पाकिस्तानने त्याच्या भूमीचा वापर आतंकवादी आक्रमणासाठी होणार नाही, याची काळजी घ्यावी !

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे संयुक्त निवेदन !

भारताचे पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर चर्चा केल्यानंतर एक पत्रकार परिषद घेऊन निवेदन सादर केले. ‘पाकिस्तानने त्याच्या भूमीचा वापर आतंकवादी आक्रमणासाठी होणार नाही, याची काळजी घ्यावी, तसेच त्यासाठी त्वरित कारवाई करावी’, असे आवाहन केले. सीमेपलीकडील आतंकवादाचा त्यांनी तीव्र निषेधही केला.

या निवेदनात अल्-कायदा, इस्लामिक स्टेट, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांच्यासह सर्व आतंकवादी गटांविरुद्ध ठोस कारवाई करा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

गेंड्याच्या कातडीच्या पाकला अशी कितीही समज दिली, तर काहीच फरक पडणार नाही. पाकला त्याला समजेल अशा भाषेत समजावून सांगितल्यावरच आतंकवाद नष्ट होईल, यासाठी भारत आणि अमेरिका यांनी कृती करणे आवश्यक आहे !