हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सलाहुद्दीन याच्या मुलाची संपत्ती जप्त

हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सलाहुद्दीन (डावीकडे) याच्या मुलाची संपत्ती जप्त

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) जिहादी आतंकवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याच्या सय्यद अहमद शकील या मुलाची संपत्ती जप्त केली आहे. हा मुलगाही आतंकवादी आहे. सध्या आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी तो अटकेत आहे. श्रीनगर आणि बडगाम येथील त्याची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

शकील आणि त्याचा भाऊ युसूफ हे पूर्वी सरकारी नोकरीमध्ये होते. वर्ष २०१८ मध्ये त्यांनी आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या उघड झाले होते. त्यानंतर प्रशासनाने दोघांनाही वर्ष २०२१ मध्ये नोकरीतून बडतर्फ केले होते. (अशांवर कठोरात कठोर कारवाईही केली पाहिजे ! – संपादक)