आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करण्याच्या प्रकरणात काश्मीरमध्ये मुसलमान पत्रकाराला अटक

इरफान मेहराज

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी अन्वेषण करत असलेल्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने श्रीनगरमधून इरफान मेहराज या पत्रकाराला अटक केली आहे. एका अशासकीय संस्थेकडून शिक्षण आणि आरोग्य या कामांसाठी पैसे गोळा करून तेे आतंकवादी कारवायांसाठी वापरणार्‍या गटाशी  इरफान याचा संबंध आहे. त्याला पुढील चौकशीसाठी देहली येथे पाठवण्यात आले आहे. आतंकवाद्यांसाठी पैसै गोळा करणार्‍या या संस्थेचा संबंध लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या आतंकवादी संघटनांशी असल्याचे सांगितले जात आहे.