|

महराजगंज (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने येथून ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक केली आहे. यात २ पाकिस्तानी आहेत, तर एक काश्मीरमधील आहे. या तिघांना नेपाळमधून भारतात घुसखोरी करतांना अटक करण्यात आली. या तिघांनी पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या साहाय्याने आतंकवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनकडून आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या अटकेनंतर भारत-नेपाळ सीमेवर अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे.
सौजन्य Aaj Tak
याविषयी पोलिसांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून आय.एस्.आय. पाकिस्तानी नागरिकासह आणखी काही आतंकवाद्यांना भारतात पाठवण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती मिळत होती. निवडणुकीतील हे आतंकवादी घातपात करू शकतात, अशी माहिती होती. यासाठी तिघांनाही पाकिस्तानात असलेल्या हिजबुल मुजाहिदीनच्या तळावर प्रशिक्षण देण्यात आले होते. तिघांचीही चौकशी चालू आहे.
संपादकीय भूमिकाभारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करणार्या पाकला भारत कधी धडा शिकवणार ? |
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू