नौशाद आणि जग्गा यांचे आतंकवादी संघटनांशी संबंध ! – देहली पोलीस

नवी देहली – येथील जहांगीरपुरी प्रकरणात अटक करण्यात आलेले आतंकवादी नौशाद आणि जगजीत उपाख्य जग्गा यांचे काही आतंकवादी संघटना अन् गुंड यांच्याशी असलेले संबंध देहली पोलिसांनी उघड केले. देहली पोलिसांच्या विशेष पथकाच्या अन्वेषणात हे आतंकवादी ‘हरकत-उल्-अन्सार’ या संघटनेचे नाझीर भट, नासिर खान आणि नझीर खान यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानचे षडयंत्र उघड !

देहलीत प्रजासत्ताकदिनी घातपात घडवून आणण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले आतंकवादी नौशाद आणि जग्गा यांचे पाकिस्तानातील कुख्यात आतंकवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनशी संबंध असल्याचेही उघड झाले आहे. या आरोपींच्या अटकेमुळे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’ खलिस्तानी आतंकवाद्यांशी संगनमत करून भारतातील स्थानिक गुंडांच्या साहाय्याने आतंकवादी आक्रमण घडवण्याचा कट रचत होते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.