(जी.पी.एस्. या प्रणालीद्वारे एखादी वस्तू किंवा व्यक्ती यांचे स्थान निश्चित करता येते.)
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या; मात्र जामिनावर सुटलेल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी जी.पी.एस्. यंत्राचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे. अशा प्रकारचा वापर करणारे जम्मू-काश्मीर पोलीस देशात पहिले ठरले आहेत. अशा प्रकारच्या यंत्राचा वापर अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांत आरोपींसाठी केला जातो.
सौजन्य पंजाबकेसरी
जम्मू-काश्मीर पोलिसांनी पहिले जी.पी.एस्. यंत्र हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित आतंकवादी गुलाम महंमद याला लावले आहे. हे यंत्र त्याच्या पायाच्या टाचांच्या वर लावण्यात आले आहे. गुलाम याला देहलीच्या पतियाळा हाऊस न्यायालयाने दोषी ठरवले आहे आणि त्याने १२ वर्षांचा कारावासही भोगला आहे. शिक्षा भोगून आल्यानंतरही तो आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. (जिहादी आतंकवाद्यांना शिक्षा झाली आणि ती भोगली, तरी त्यांच्यातील जिहादी वृत्ती पालटत नाही. त्यामुळे अशांना फाशीचीच शिक्षा करायला हवी ! – संपादक)
संपादकीय भूमिकाआतंकवाद्यांवर वेसण घालण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा कितीही वापर केला, तरी आतंकवादी त्याच्यावरही मात करून आतंकवादी कारवाया करतात, हे अनेक घटनांतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानासह आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर धोरण नेहमीच अवलंबणे आवश्यक आहे ! |