‘तो’ची मंगल गुढीपाडवा ।

गुरूंची आरती सांगते सर्वांना । ज्योतीने ज्योत लावा ।
सर्व विश्‍व ज्ञान प्रकाशमय होईल । ‘तो’ची मंगल गुढीपाडवा ॥

आंब्याच्या पानांचे महत्व

ईश्‍वराकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या कोवळ्या पानात ३० टक्के, तर आंब्याच्या परिपक्व पानात १० टक्के असते. कोवळ्या पानात तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळ्या पानांचा वापर करावा.

गुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाची सात्विक रांगोळी

देवतांचे तत्व आकृष्ट करण्याचे सामर्थ्य असणार्‍या सात्विक रांगोळ्या सणांच्या दिवशी काढा !

कडूलिंबाच्या पानांचे महत्व

गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. कडूलिंब हे सत्व लहरींचे प्रतीक आहे. ईश्‍वरी तत्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानानंतर कडूलिंबाच्या पानात अधिक असते.

हिंदु संस्कृतीची प्राचीनता !

२०२० या वर्षाच्या गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२२ व्या वर्षाचा आरंभ होत आहे.

गुढीपाडव्याचा सण सात्विक पद्धतीने साजरा करूया आणि स्वत:तील धर्मतेज जागवूया !

या गुढीपाडव्याला, तसेच वर्षभरात येणार्‍या सर्व हिंदु सणांना पारंपरिक आणि सात्त्विक हिंदु पोषाख परिधान करून अन् शक्य असल्यास सोन्या-चांदीचे सात्त्विक पारंपरिक अलंकार परिधान करून आणि वेणी, खोपा किंवा आंबाडा यांसारखी सात्त्विक केशरचना करून देवतांचे शुभाशीर्वाद संपादन करूया.’

म्हैसुरू (कर्नाटक) येथे ग्रंथालयाला लावण्यात आलेल्या आगीमध्ये गीतेच्या ३ सहस्र प्रती जळल्या

म्हैसुरू येथे समाजकंटकांनी एका ग्रंथालयाला लावलेल्या आगीत श्रीमद्भगवद्गीतेच्या ३ सहस्र, तर कुराण आणि बायबल यांच्या १ सहस्र प्रती नष्ट झाल्या.

देवता, संत आणि संस्कृती यांची विटंबना रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा आवश्यक ! – स्वामी कमेश्‍वरपुरी

या कायद्याविषयी सामाजिक माध्यमातील ‘फेसबूक’वरून थेट कार्यक्रम घेऊ शकतो. यासाठी माझे सभागृह तुम्हाला उपलब्ध करून देईन, तसेच धर्मकार्यासाठी जे साहाय्य हवे आहे, ते करण्यासाठी मी सदैव सिद्ध आहे.

अन्य प्रार्थनास्थळे नाहीत, तर केवळ हिंदूंची मंदिरे सरकारच्या कह्यात ! – अधिवक्ता अंकुर शर्मा, जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय, देहली

भारतीय राज्यघटनेतील कलम २६ प्रमाणे भारत सरकारला सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांना अधिग्रहित करण्याचे अधिकार असतांना आजवर केवळ हिंदूंची मंदिरे कह्यात घेतली आहेत.

कुंभपर्वात गोदावरीच्या रामकुंडातील जलात राजयोगी (शाही) स्नान करण्यापूर्वी आणि नंतर होणारा आध्यात्मिक स्तरावरील पालट !

नाशिक कुंभमेळ्याच्या राजयोगी स्नानापूर्वीच्या आणि नंतरच्या रामकुंडातील दोन्ही जलांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?’, हे पाहण्यासाठी केलेली चाचणी . . .