गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. कडूलिंब हे सत्व लहरींचे प्रतीक आहे. ईश्वरी तत्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानानंतर कडूलिंबाच्या पानात अधिक असते. या दिवशी कडूलिंबाच्या कोवळ्या पानाद्वारे वातावरणात पसरलेल्या प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात. जिवाला कडूलिंबाच्या पानांच्या माध्यमातून सूक्ष्म-रूपाने प्रजापति लहरी मिळत असतात.