

विश्वाच्या प्रांगणी, उभी करा । उंच गुढी मांगल्याची ।
जी असेल चैतन्यमय आणि सात्त्विक हिंदु राष्ट्राची ॥ १ ॥
सनातन हिंदु धर्म संस्कृती आहे । सर्वांना शिकण्यासाठी ।
तद्नंतर ती आहे, सान-थोरांनाही । शिकवण्यासाठी ॥ २ ॥
ईश्वर-निर्मित ती असल्याने अयोग्य आणि चुकीचे ।
तेथे काही नाही । म्हणून तिने, नराचे नरोत्तम केले ।
तथा नरोत्तमाचे नारायणही ॥ ३ ॥
चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेची मंगल गुढी ही । काय संदेश देते पहा ।
किती गेलात सर्वोच्च स्थानी तरी । भूमीवर पाय ठेवूनी रहा ॥ ४ ॥
डौलदार मंगल विजयगुढी ही । काहीशी झुकलेली असते ।
अहंकार नको, नम्रता हवी । असे जणू ती शिकवते ॥ ५ ॥
उंच मंगल गुढी असे सांगते । हिंदु संस्कृती आपुली सर्वोच्च ।
सर्वांना सामावून सांभाळून घेणारी ।
वात्सल्यमूर्ती गुरुमाऊली जणू हीच ॥ ६ ॥
जन्महिंदूंनो आणि कर्महिंदूंनो । पुढच्या पुढच्या वर्गात चला ।
आर्त, जिज्ञासू, मुमुक्षू अन् साधक ।
शिष्य, सिद्ध अशी वर्ग शृंखला ॥ ७ ॥
केवळ आर्त वर्गात राहूनी । आर्त अंधारी गोंधळू नका ।
पुढील वर्गी जाऊनी ज्ञानदीप मिळवा ।
गुरुकृपेने मिळेल आनंद सखा ॥ ८ ॥
गुरूंची आरती सांगते सर्वांना । ज्योतीने ज्योत लावा ।
सर्व विश्व ज्ञान प्रकाशमय होईल । ‘तो’ची मंगल गुढीपाडवा ॥ ९ ॥
– श्री. द.र. पटवर्धन, कोलगाव, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग. (२२.२.२०२०)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
धर्मशास्त्र काय सांगते ?
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !