१. सुती किंवा रेशमी नऊवारी साडी आणि धोतर यांमध्ये पुष्कळ सात्विकता अन् चैतन्य असल्यामुळे ही वस्त्रे परिधान करणार्यांनाही सात्विकता तसेच चैतन्य यांचा लाभ होण्यास साहाय्य होेते.
२. स्त्रियांनी नथ, ठुशी, पाटल्या, पैंजण, कंबरपट्टा इत्यादी सोन्या-चांदीचे सात्विक अलंकार परिधान केल्याने देवतांच्या तेजतत्वयुक्त चैतन्यलहरी दागिन्यांकडे आकृष्ट होतात.
३. वेणी, खोपा किंवा अंबाडा यांसारखी सात्विक केशरचना केल्याने त्यांची सात्विकता वाढून साधनेला पोषक असणारी सुषुम्ना नाडी चालू रहाते.
४. पारंपरिक सात्विक हिंदु वस्त्र, अलंकार आणि केशरचना यांच्या त्रिवेणी संगमामुळेे सणाच्या दिवशी वायूमंडलात मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होणार्या देवतांच्या चैतन्यलहरी आपल्याला अधिकाधिक प्रमाणात ग्रहण होतात.
५. पारंपरिक सात्विक हिंदु वस्त्र, अलंकार आणि केशरचना यांमुळे या गोष्टी धारण करणारा, त्यांना पहाणारा अन् त्यांच्या सभोवतालच्या व्यक्ती यांनाही सात्विकता तसेच चैतन्य यांचा लाभ होऊन सर्वांचीच सात्विकता वाढण्यास आणि वाईट शक्तींंचा त्रास न्यून होण्यास साहाय्य होते.
या गुढीपाडव्याला, तसेच वर्षभरात येणार्या सर्व हिंदु सणांना पारंपरिक आणि सात्विक हिंदु पोषाख परिधान करून अन् शक्य असल्यास सोन्या-चांदीचे सात्विक पारंपरिक अलंकार परिधान करून आणि वेणी, खोपा किंवा आंबाडा यांसारखी सात्विक केशरचना करून देवतांचे शुभाशीर्वाद संपादन करूया.’
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.