Cultural Marxism : संस्कृतीवरील आक्रमकांचे मुखवटे ओळखून त्यांच्या विरोधात लढले पाहिजे ! – अभिजीत जोग

धर्मसंस्था, राष्ट्रवाद आणि शिक्षणव्यवस्था हे संस्कृतीचा आधार आहेत. त्यामुळे त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपली संस्कृती नष्ट झाली, तर आपले अस्तित्व संपून जाईल. त्यामुळे हे आक्रमण समजून घेतले पाहिजे.

वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा चौथा दिवस (२७ जून) : राष्ट्र, धर्म, संस्कृती रक्षणाचे प्रयत्न कसे करावेत ?

हिंदुत्वनिष्ठांनी ‘डिजिटल’ योद्धे बनले पाहिजे. भ्रमणभाष हे आपले आजच्या काळातील दुहेरी शस्त्र आहे. ते कसे वापरायचे ? हे शिकून घेतले पाहिजे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर असते, तर त्यांनी हेच सांगितले असते.

हिंदु राष्‍ट्र बनवण्‍यासाठी मोठे जनआंदोलन उभारणे आवश्‍यक ! – प्रवीण चतुर्वेदी, संस्‍थापक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी, ‘प्राच्‍यम’

आज संपूर्ण जग हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांना नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न करत आहे. त्‍यामुळे आपल्‍याला संघटित होऊन त्‍याचा सामना करावा लागेल. हिंदु राष्‍ट्र बनण्‍यासाठी धार्मिकता आणि आध्‍यात्मिकता यांचे मिश्रण असलेले एक मोठे जनआंदोलन उभे करणे आवश्‍यक आहे. तेच हिंदु जनजागृती समिती या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या माध्‍यमातून करत आहे.

अश्‍लीलता पसरवून समाजावर आघात करणार्‍यांवर बलात्‍काराचा गुन्‍हा नोंदवायला हवा ! – उदय माहुरकर, संस्‍थापक, सेव्‍ह कल्‍चर सेव्‍ह भारत फाऊंडेशन, देहली

‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म्‍स’वर व्‍यभिचार दाखवणार्‍यांची जागा कारागृहात असायला हवी. हे रोखण्‍यासाठी आम्‍ही योजना निश्‍चित करत आहोत. अश्‍लीलता पसरवून समाजावर आघात करणार्‍यांवर बलात्‍काराचा गुन्‍हा नोंदवायला हवा. अशांना ३ वर्षांपर्यंत जामीन मिळू नये.  संस्‍कृतीवरील हे आक्रमण राष्‍ट्रद्रोह मानला जावा, असा कडक कायदा या विरोधात असणे अपेक्षित आहे.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा चौथा दिवस (२७ जून) उद़्‍बोधन सत्र – ओटीटी आणि हिंदी चित्रपटसृष्‍टी

भारतावर आक्रमण करणार्‍यांनी जेवढी देशाची हानी केली नाही, तेवढी हानी ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म्‍स’वरील व्‍यभिचारी व्‍हिडिओंच्या माध्‍यमातून झाली आहे. ८० टक्‍के बलात्‍कार अशा प्रकारचे व्‍हिडिओ पाहून होत आहेत !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाचा चौथा दिवस (२७ जून) : हिंदु राष्‍ट्रसाठी वैचारिक आंदोलन

सद्य:स्‍थितीत विषयाचा प्रॉपगंडा (प्रचार) करून राष्‍ट्र आणि हिंदु धर्म यांच्‍या विरोधात ‘नॅरेटिव्‍ह’ (कथानक) पसरवले जात आहेत. यामागे राष्‍ट्रविरोधी शक्‍ती कार्यरत आहेत.

Anti-Hindu OTT Platforms : धर्महानी करणार्‍या ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म्‍स’वर अंकुश ठेवणारे परिनिरीक्षण मंडळ आवश्‍यक ! – ज्‍योत्‍सना गर्ग, महासचिव, ‘नेशन फर्स्‍ट कलेक्‍टिव्‍ह’

विदेशी संस्‍थांना हिंदु धर्म आणि संस्‍कृती नष्‍ट करायची असल्‍याने ते धर्म-संकृतीविरोधी चित्रपटांना अधिक प्रमाणात आर्थिक साहाय्‍य करतात. अशा चित्रपटांना सर्वांनी संघटित होऊन विरोध करणे आवश्‍यक आहे.

ॐ प्रमाणपत्राच्या माध्यमातून हलाल प्रमाणपत्राच्या इस्लामी अर्थव्यवस्थेला रोखा ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, देहली

तीर्थक्षेत्रांच्या  ठिकाणी असलेल्या प्रसादाच्या दुकानांना ‘ॐ प्रतिष्ठान’ कडून ‘ॐ प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. ॐ प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदूंनी हलाल प्रमाणपत्राला झटका द्यावा.

काशी विश्वेश्वर मंदिराच्या मुक्तीसाठी कायदेशीर लढा देणार्‍या धर्मप्रेमींचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गौरव !

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ग्रंथ भेट देऊन त्यांचा गौरव केला. या वेळी उपस्थित धर्मप्रेमींनी ‘बाबा विश्वनाथकी जय’, ‘नम: पार्वतीपते हर हर महादेव’ या घोषणा दिल्या.

लोकसभेत ‘पॅलेस्‍टाईन’ विजयाच्‍या घोषणा देणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा !

भारतीय राज्‍यघटनेच्‍या अनुच्‍छेद १०२ ‘ड’ नुसार संसदेतील कोणत्‍याही सदस्‍याने अन्‍य कुणाल्‍याही देशाला समर्थन देणे बेकायदेशीर आहे. यानुसार त्‍यांचे सदस्‍यत्‍व रहित होते.