पुण्यात अक्षय्य तृतीयेला होणार्‍या मनसेच्या महाआरतीला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पुण्यातील सर्व मंदिरांत ३ मे या दिवशी म्हणजेच अक्षय्य तृतीयेला महाआरती करण्यात येणार असून त्यामध्ये मनसैनिकांसह विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्यासह संलग्न असलेल्या ७ ते ८ संघटना कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले आहे.

गोव्यातील हिंदू आणि ख्रिस्ती यांच्या पूर्वजांवरील अत्याचाराची माहिती देणार्‍या ‘गोवा फाईल्स’ ३ मे या दिवशी खुल्या करणार ! – हिंदु रक्षा महाआघाडी

गोव्यात ‘होली इन्क्विझिशन’ने २५२ वर्षे केलेल्या अत्याचारांची माहिती नव्या पिढीला दिली जाणार ! ३ मेच्या भगवान परशुराम जयंती कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘शिवशक्ती महायज्ञ’ पार पडला !

हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने पारंपरिक शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील एक कार्यक्रम म्हणून बलशाली हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी २७ एप्रिल या दिवशी कृष्णामाई घाट, प्रीतीसंगम या ठिकाणी ‘शिवशक्ती महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते.

कुडाळ शहरातील अनधिकृत भोंगे त्वरित काढा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

आमचा कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला विरोध नाही. सर्वांना आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वतंत्र आहे; परंतु कोणत्याही धर्माच्या उपासना पद्धतीद्वारे इतर धर्मियांना त्रास होत असेल, तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

राज ठाकरेंच्या संभाजीनगरमधील सभेला अनुमती मिळणारच ! – बापू वागस्कर, राज्य सरचिटणीस, मनसे

संभाजीनगर येथे १ मे या दिवशी होणार्‍या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला राज्य सरकार अनुमती देईलच आणि नाही दिली तरी आपण न्यायालयातून अनुमती आणू.

विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी !

शिवछत्रपतींचा अमूल्य ठेवा असलेला विशाळगड राज्याचा पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज दुरवस्थेत आहे.

बेंगळुरू येथील ख्रिस्ती शाळेत विद्यार्थ्यांना बायबल आणणे बंधनकारक केल्याने हिंदू संघटनांचा विरोध

हिंदू धर्मनिरपेक्षतेचे पालन करतात, तर अन्य धर्मीय त्यांच्या धर्माचे पालन करण्यासह हिंदूंनाही त्याचे पालन करण्यास दबाव निर्माण करतात ! स्वतःच्या मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवण्यात धन्यता मानणारे हिंदु पालक आतातरी यातून बोध घेतील का ?

राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटाच्या वेळी सर्वांनी धर्माच्या बाजूने राहिले पाहिजे ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ मत नाही, तर व्रत झाले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले.

कोरुतला येथे हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदु राष्ट्रासाठी सामूहिक प्रार्थना !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त तेलंगाणामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती’अभियानांतर्गत जगित्याल जिल्ह्यातील कोरुतला येथील श्री महादेव मंदिरामध्ये स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या समवेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

नाशिक येथे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा नोंद !

ब्राह्मण आणि पुरोहित यांची खिल्ली उडवतांना वाचाळवीर अमोल मिटकरी आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री धनंजय मुंडे अन् जयंत पाटील यांना किती हसू अनावर झाले आहे ? अशी हिंदु संस्कृतीची चेष्टा करायला आणि अवमानित करायला त्यांच्या नास्तिक पवारसाहेबांनी शिकवले का ?