२६४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार, महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांत होणार ‘जिल्हा मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’ !

ओझर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ची ३ डिसेंबर या दिवशी सांगता झाली. २ दिवसांसाठी आयोजित या परिषदेमध्ये उपस्थित राहिलेल्या विश्‍वस्तांनी २६४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणार असल्याचे सांगितले.

हिंदु राष्ट्रासाठी जागे झाले नाही, तर उद्या इस्लामी राष्ट्रात रहावे लागेल ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, तरुण हिंदू

हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येक गावात जाऊन हिंदूंना एकत्र करून प्रबोधन करावे लागेल. जर आपण आज हिंदु राष्ट्रासाठी जागे झालो नाही, तर उद्या आपल्याला इस्लामी राष्ट्रात रहावे लागेल, असे वक्तव्य ‘तरुण हिंदू’ संघटनेचे संस्थापक डॉ. नील माधव दास यांनी केले.

धर्म, भक्त आणि देव यांचे हित लक्षात घेऊन मंदिरांचे व्यवस्थापन पहावे !

‘मंदिर सुव्यवस्थापन’ परिसंवादामध्ये विश्‍वस्तांची भावना !

राजकीय पक्षांमध्ये शहरी नक्षलवाद्यांची घुसखोरी ?

‘सध्या राजकीय पक्षांत शहरी नक्षलवाद्यांची घुसखोरी ही अराजकतेची चाहूल आहे’, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मांडले. ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक श्री. स्वप्नील सावरकर यांनी श्री. शिंदे यांची ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर विशेष मुलाखत घेतली.

जन्महिंदूंचे कर्महिंदूंत रूपांतर करण्याचे कार्य मंदिरांच्या माध्यमातूनच शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

ओझर (पुणे) येथे चालू असलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेतील संत आणि मान्यवर यांचे विचारधन ! ओझर (जिल्हा पुणे), २ डिसेंबर (वार्ता.) – प्राचीन काळापासून मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे आहेत. धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य वेळोवेळी मंदिरांच्या माध्यमातून झाले. त्यामुळे आपल्याकडे विविध शासकांनीही मंदिरे उभारली. मंदिर संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्व प्रकारची साहाय्यता केली. … Read more

शरीरात प्राण असेपर्यंत मठ-मंदिरे आणि सनातन धर्मरक्षणाचा प्रण घ्या ! – महंत सुधीरदासजी महाराज, काळाराम मंदिर, नाशिक

ओझर (पुणे) येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेला प्रारंभ ! मंदिरांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी राज्यभरातील ५५० हून अधिक विश्‍वस्त एकवटले ! ओझर (जिल्हा पुणे), २ डिसेंबर (वार्ता.) – धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी संघर्ष करा. छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत. त्यांनी आपल्याला धर्मासाठी झुंजण्याची वृत्ती दिली. ८ लाखांचे सैन्य घेऊन महाराष्ट्रात शिरलेल्या औरंगजेबाला … Read more

सोलापूर येथे युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर या दिवशी उपलप मंगल कार्यालय या ठिकाणी युवतींसाठी ‘शौर्य प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते.

नागरिकांना आकर्षित करणारा ठाणे येथील मंदिरात लावलेला हिंदु जनजागृती समितीचा आकाशकंदिल !

प्रताप सिनेमा कोलबाड भागातील भोलेनाथ मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या वर्षी दिवाळीच्या निमित्त आकाशकंदिल लावण्यात आला होता.

Goa State Mandir Parishad : म्हार्दोळ येथे १० डिसेंबर या दिवशी होणार्‍या राज्यस्तरीय मंदिर परिषदेच्या प्रचाराला गती !

मंदिरांचे सुव्यवस्थापन करणे आणि मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे या हेतूने या मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला गोव्यातील समस्त मंदिरांचे विश्वस्त आणि पुरोहित सहभागी होणार आहेत.

सनातन धर्माला संपवण्याचे ‘हेट स्पीच’ करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही ? – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, एच्.आय.व्ही. या रोगांशी तुलना करून सनातन धर्मच संपवण्याची भाषा देशात काही दिवसांपूर्वी सनातन धर्मद्वेष्ट्यांकडून करण्यात आली. महाराष्ट्रात याविषयी आतापर्यंत १२१ ठिकाणी तक्रारी प्रविष्ट केल्या