जैन पंथियांचे श्रद्धास्थान सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करा ! – उमेश गांधी, हिंदु महासभा

सरकारच्या या निर्णयामुळे अहिंसावादी जैन पंथियांना संपूर्ण भारतामध्ये मोर्चे काढून निषेध आंदोलने करावी लागली. त्यामुळे केवळ जैन पंथियांच्याच नव्हे, तर कोणत्याही धार्मिक स्थळांचे महत्त्व जाणून घेऊन सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे.

जोशीमठातील आपद्ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शंकराचार्यांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

सरकारी यंत्रणा आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास अपयशी ठरल्यामुळेच हिंदूंच्या धर्मगुरूंवर अशी याचिका प्रविष्ट करण्याची वेळ येते !

श्री. राहुल कौल

काश्‍मिरी हिंदूंच्‍या समस्‍यांकडे सरकारचे दुर्लक्ष ! – राहुल कौल, पनून कश्‍मीर

काश्‍मीरमधील आतंकवाद संपवायचा असेल, तर सर्व काश्‍मिरी हिंदूंना एकाच ठिकाणी पुनर्स्‍थापित केले पाहिजे, अशी मागणी काश्‍मिरी हिंदूंसाठी लढणार्‍या ‘पनून कश्‍मीर’ या संघटनेचे श्री. राहुल कौल यांनी केली.

मध्‍यप्रदेशात फैजल याने हिंदु असल्‍याचे भासवून हिंदु दलित मुलीवर ३ वर्षे केला बलात्‍कार !

यावरून मध्‍यप्रदेशमधील लव्‍ह जिहादविरोधी कायद्यालाही धर्मांध जुमानत नाहीत, हेच दिसून येते ! लव्‍ह जिहाद रोखण्‍यासाठी सरकार आता तरी आणखी कठोर पावले उचलणार का ?

मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाला कंटाळून पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांचा दुकान विकण्याचा निर्णय !

राणे यांच्यावर आलेली ही वेळ हिंदूंना विचार करायला लावणारी आणि वस्तूस्थितीची जाणीव करून देणारी आहे ! निवेदनांकडे दुर्लक्ष करण्याच्या पोलिसांच्या वृत्तीमुळे नागरिकांनी कायदा हातात घेतला, तर आश्चर्य वाटू नये !

सिंधुदुर्ग : बांदा येथे ८ जानेवारीला होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारकार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंचा प्रचारकार्याला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पहाता ही सभा निश्चितच यशस्वी होणार आहे, असा दृढ विश्वास हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी व्यक्त केला आहे.

पाकमध्ये हिंदु विवाहित तरुणीचे मुसलमान पोलीस कर्मचार्‍याकडून अपहरण आणि विवाह !

पाकमध्ये पोलीस कर्मचारी ओबेदुल्ला खोसो याने विवाहित हिंदु तरुणी लाली कच्छी हिला बलपूर्वक पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला.

‘ऑप इंडिया’ वृत्तसंकेतस्थळानुसार वर्षभरात ‘लव्ह जिहाद’च्या १५३ घटना !

देशात वर्ष २०२२ मध्ये ‘लव्ह जिहाद’च्या १५३ घटनांचे वार्तांकन ‘ऑप इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाने केले होते. लव्ह जिहादच्या घटना याहून अधिक असण्याची शक्यता आहे; कारण काही घटना समाजासमोर, पोलिसांसमोर येऊ शकलेल्या नाहीत. या घटनांमध्ये हिंदु मुली, तरुणी, महिला आणि तरुण बळी पडलेले आहेत.

हिंदुत्वासाठी दिशादर्शक ठरलेली जळगाव येथील अभूतपूर्व हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

२५ डिसेंबरला संपन्न झालेल्या या सभेला १८ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदूंनी ‘हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज कोणत्याही विरोधाने बंद होणार नाही, जर विरोध केला, तर त्याला चोख प्रत्युत्तर देऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणारच’, अशी शपथ घेतली…

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील महंत मार्तंड पशुपती यांचा शिरच्छेद करण्याची धमकी

उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांना महंतांना अशा धमक्या मिळणे अपेक्षित नाही. याप्रकरणी सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे !