|
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – प्रयागराज जिल्ह्यातील खीरी गावामध्ये सत्यम शर्मा या १६ वर्षांच्या मुलाने बहिणीच्या काढण्यात येणार्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे मुसलमानांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मात्र ही हत्या छेडछाडीच्या प्रकरणामुळे नाही, तर शाळेतील वादामुळे झाल्याचे सांगितले. या प्रकरणी ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात सरपंच महंमद युसूफ याचाही समावेश आहे. हत्येच्या घटनेनंतर संतप्त हिंदूंनी येथे आंदोलन करत रस्ता बंद केला. ९ घंटे हे आंदोलन चालू होते.
Prayagraj: Mohammad Yusuf, Mohsin & two others beat Satyam Sharma to death, family says they were harrasing boy’s sister but police denies https://t.co/vzvB5HLL3f
— OpIndia.com (@OpIndia_com) August 29, 2023
१. ही घटना तुर्कपुरवा मोहल्ल्यात महंमद युसूफ याच्या घरासमोर झाली. मारहाणीच्या वेळी युसूफ याने मारहाण करणार्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. छेड काढणारे तरुण त्याच्याच घरातील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. युसूफ याच्यावर पूर्वीही काही गुन्हे नोंद आहेत.
२. सत्यम शर्मा यांच्या नातेवाइकांनी सांगितले की, मुलीची यापूर्वी शाळेतही छेड काढण्यात आली होती. तेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार करण्यात आली होती.
३. याविषयी शाळेचे व्यवस्थापक मनोज पांडेय यांनी सांगितले की, नातेवाइकांच्या तक्रारीनंतर छेड काढणार्या तरुणांना समजावण्यात आले होते. काही वेळा शाळेबाहेर पोलीस शिपाई नियुक्त करण्यात आले होते.
संपादकीय भूमिका
|