हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा !

गेल्या मासात नूंह (हरियाणा) येथे धर्मांधांनी हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करत हिंसाचार केला. या पार्श्‍वभूमीवर हा लेख देत आहोत. १ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारतात अस्तित्वाचा लढा चालू झाल्याची चर्चा, उदारमतवादी हिंदूंच्या निष्क्रियतेचा मुसलमानांना लाभ आणि बहुसंख्य असतांनाही शांतता राखण्याचे दायित्व हिंदूंकडेच’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा उर्वरित भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/716139.html

नूंह येथे हिंसाचारामध्ये जाळण्यात आलेले चारचाकी वाहन

५. धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये मुसलमान प्रगत

‘आय.पी.एस्.’ (भारतीय पोलीस सेवा) अधिकारी नजमूल होडा यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये मुसलमानांची ‘नॅरेटिव्ह ऑफ लॉस’ (हानी होत असल्याचे कथानक) याविषयी लिहिले आहे. ते म्हणतात, ‘‘भारतात मुसलमान पूर्वीपेक्षा अधिक संख्येने आहेत. तसेच भारतात मोठ्या संख्येने मशिदी, मदरसे आणि मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) आहेत, तसेच त्यांचा वेश आणि त्यांचे रहाणीमान यावरून त्यांची धार्मिकता चांगल्या प्रकारे प्रदर्शित होत आहे.’’ सामाजिक वर्तुळामध्ये इस्लाम धर्माची तीव्रता वाढली आहे. जागतिक परिस्थिती लक्षात घेता आज मुसलमान हे चांगले पोषित, चांगले कपडे घालणारे, चांगले शिकलेलेे आणि चांगली आर्थिक स्थिती असलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘हानी झाल्याविषयीचे कथन’ या कालबाह्य ठरलेल्या सूत्राला धर्मशास्त्रामध्ये कोणतेही स्थान नाही. धर्मशास्त्रामध्ये ‘दार उल इस्लाम’ (जेथे इस्लामचे शासन चालते, असा प्रदेश) आणि ‘दार उल हरब’(जेथे इस्लामचे शासन चालत नाही, असा प्रदेश) अशी संकल्पना असलेल्या सूत्रांना सध्याच्या जगात अर्थ रहात नाही. धार्मिक व्यक्तींचा राजकीय सत्तेवर एकाधिकार असल्याखेरीज या कथेमध्ये श्रद्धेचा व्यावसायिकपणा आणि कर्मकांडांचे पालन या गोष्टी पुरेशा ठरत नाहीत.

६. रेल्वेतील गोळीबार प्रकरणाचा ‘सेक्युलर’ (निधर्मी) माध्यमांकडून विपर्यास

रेल्वेमध्ये गोळीबार केल्याची घटना आणि नूंहमधील हिंंसाचार यांवर होणारी चर्चा यावरून प्रत्यक्ष स्थिती अन् कथित स्थिती यांमधील अंतर, तसेच स्पर्धात्मक अस्तित्ववादातील विषमताही दिसून येते. रेल्वेमध्ये गोळीबार झाल्याची बातमी पसरली आणि त्यात ठार झालेल्या ४ व्यक्तींपैकी ३ मुसलमान व्यक्ती आहेत, हे समजताच काँग्रेस पक्षाने लगेच ‘थंड रक्ताने द्वेषापोटी केलेला गुन्हा’, असा आरोप करत या घटनेमागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचा संशय व्यक्त केला. तथाकथित चित्रफितीमध्ये त्या हवालदाराला शिस्त न पाळणारी, आज्ञा न पाळणारी, संतापी व्यक्ती असल्याचे दाखवून गोळ्या झाडतांना तो ‘मोदी, योगी आणि ठाकरे’, असे ओरडत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रफितीच्या आधारे काँग्रेसने भाजपवर आरोप केला. या घटनेविषयी दाखवण्यात आलेली माहिती आणि प्रत्यक्ष पहाणार्‍यांनी दिलेली महिती यामध्ये पुष्कळ तफावत आहे. चेतन सिंह याचा सहकारी हवालदार घनश्याम आचार्य याने सांगितले की, आक्रमण करणारा अस्वस्थ होता आणि रागाच्या भरात त्याने माझा गळा धरला आणि माझ्याकडून बंदूक हिसकावून घेतली. यावरून ‘त्याने द्वेषापोटी ही कृती केली’, असा निष्कर्ष काढण्यात आला. प्रत्यक्षात चेतन सिंह याने आचार्य यांची रायफल परत दिली आणि नंतर तो त्याच्या अधिकार्‍याशी भांडू लागला. त्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम मीना यांनी ‘त्याने ३ प्रवाशांची हत्या करण्यापूर्वी त्यांच्यावर ४ गोळ्या झाडल्या. हे तिन्ही प्रवासी मुसलमान होते’, असे सांगितले.

‘इंडिया टुडे’ सारख्या मासिकामध्ये सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करण्यात आले आहे की, चौघांची हत्या केल्यानंतर सिंह हा रेल्वेमधून उतरला आणि त्याने रेल्वेवर स्वैर गोळीबार केला. ‘इकॉनॉमिक टाइम्स’मधील वृत्तामध्ये म्हटले आहे, ‘‘या घटनेच्या वेळी सिंह  रेल्वेच्या कितीतरी डब्यांमधून प्रवाशांवर गोळीबार करत गेला. त्याने ‘पँट्री कार’मध्ये (भोजन बनवण्याचा डबा) अजून एका व्यक्तीची हत्या केली आणि त्यानंतर ‘एस्-६’ या डब्यामध्ये असघर अब्बास अली या व्यक्तीची हत्या केली. त्याने गोळीबार चालू ठेवल्याने प्रवाशांनी वाचण्यासाठी लपण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या गोळ्यांनी रेल्वेच्या खिडक्यांची तावदाने फुटली.’’ या वृत्तानुसार रागाच्या भरात केलेली कृती हेतूपूर्वक केली, असे प्रतित होते. जर मोदी, योगी किंवा ठाकरे यांची नावे घेणे, म्हणजे मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार भडकावणे आणि हिंदु आतंकवादाचे उदाहरण असेल, तर त्या तर्कानुसार इस्लामी मूलतत्त्ववाद्यांकडून समाजातील लोकांच्या केल्या जाणार्‍या हत्याही हिंदूच्या विरोधात हिंसाचार भडकावण्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे इस्लामी आतंकवाद  म्हणणे, म्हणजे ‘इस्लामोफोबिया’ (इस्लामचा तिरस्कार) असे होत नाही. नूंहमधील हिंसाचारामध्ये हिंदूंनी मुसलमानांवर अत्याचार झाले, असा प्रचार करून बाजू पलटू पहाणार्‍यांना हिंदूंचा तिरस्कार करणारी विदेशी प्रसिद्धीमाध्यमे सत्य परिस्थिती बाजूला ठेवून दुजोरा देत आहेत; परंतु सत्य परिस्थिती वेगळी आहे.

७. नूंह येथील गाफील प्रशासनामुळे धर्मांधांकडून सुनियोजित हिंसाचार !

बजरंग दलाने आयोजित केलेली यात्रा

पोलिसांचे प्रथमदर्शनी अहवाल आणि इतर अहवालांतून अशी माहिती समोर आली आहे की, ‘बजरंग दलाने त्यांच्या भागातून आयोजित केलेल्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेत गोरक्षक मोनू मनेसार हे सहभागी होणार आहेत’, असे स्थानिक मुसलमानांच्या गटांना बातमी देऊन त्यांना भडकावले गेले होते. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘२१ ते २३ जुलै या काळात नूंहमधील काही स्थानिक मुसलमानांच्या गटांनी बैठका घेऊन या यात्रेवर आक्रमण करण्याचे नियोजन केले होते. या यात्रेमध्ये मोनू मनेसार सहभागी होणार आहेत, असे त्यांना वाटत होते. बैठकीला उपस्थित लोकांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर गट केले आणि प्रत्येक गटाच्या प्रमुखाला यात्रेकरूंवर फेकण्यासाठी दगड अन् काचेच्या बाटल्या गोळा करण्याचे उत्तरदायित्व देण्यात आले.’ या वृत्तामध्ये स्थानिक रहिवाशांनी दिलेली माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या रहिवाशांनी म्हटले आहे, ‘‘आम्ही २०० दुचाकी जमवल्या आणि पोलिसांनी कारवाई करू नये; म्हणून त्यांच्या नंबर प्लेटवर काळा रंग फासला. याखेरीज अनुमाने ३ सहस्र काचेच्या बाटल्या जमवण्यात आल्या. यापैकी बाटल्यांच्या उपयोग यात्रेकरूंना लक्ष्य करण्यासाठी केला जाणार होता. त्यापैकी काही बाटल्यांमध्ये पेट्रोलही भरण्यात आले होते. हे सर्व साहित्य त्यानंतर यात्रेवर आक्रमण करणार्‍या वेगवेगळ्या गटांना पोचवण्यात आले.’’ याखेरीज नूंह येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंजली जैन यांनी प्रविष्ट केलेल्या प्रथमदर्शनी अहवालातून भयानक महिती समोर आली आहे. अंजली जैन आणि त्यांची ३ वर्षांची मुलगी यांना दंगलखोरांपासून वाचण्यासाठी एका गॅरेजमध्ये लपून रहावे लागले. आक्रमणकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर आक्रमण करून गाडीची नासधूस केली.

हिंदूंकडून काढल्या जाणार्‍या यात्रेच्या वेळी उपजिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झालेल्या अबिद हुसेन यांनी प्रविष्ट केलेल्या प्रथमदर्शनी अहवालात म्हटले आहे, ‘‘मंदिरामध्ये ३० ते ४० हिंदू अडकून पडले होते आणि त्यांना मंदिराबाहेर पाऊलही काढता येत नव्हते. अनुमाने ७०० ते ८०० लोकांचा जमाव यात्रेकरूंवर दगडफेक करतांनाच त्यांच्या आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात अवैध शस्त्रांचा वापर करत होता.’’ ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्रामध्ये आलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे, ‘‘नूंह येथील हिंसाचारात ठार झालेल्यांमध्ये पानिपत येथील अभिषेक चौहान हा होता. त्याने या यात्रेमध्ये भाग घेतला होता आणि यात्रेला विरोध करणार्‍यांनी केलेल्या गोळीबारामध्ये गोळी लागून तो ठार झाला.’’ त्याचा चुलत भाऊ महेश याने म्हटले आहे, ‘‘नलहार येथील शिवमंदिरातून आम्ही बाहेर आल्यावर आम्हाला तलवारी, बंदुका आणि दगड घेऊन येणार्‍या लोकांचा जमाव मंदिराकडे येतांना दिसला. त्यांनी लोकांना मारहाण करण्यास प्रारंभ केला. तसेच त्यांनी गोळीबार करण्यासह वाहनांना आग लावणे चालू केले. त्या वेळी माझ्या भावाला एक गोळी लागून तो खाली पडला. मी साहाय्यासाठी हाका मारल्या; परंतु जवळपास कुणीही नव्हते. मला अभिषेकला सुरक्षित ठिकाणी न्यायचे होते; परंतु या जमावापैकी एकाने तलवारीने अभिषेकच्या मानेवर वार केला आणि तो पळून गेला.’’ या जमावामध्ये पाकिस्तानी लोकांचा सहभाग असल्याविषयीच्या चित्रफिती सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्या आहेत. अशा प्रकारचा सुनियोजित हिंसाचार घडवून आणला जाणे, म्हणजे हे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात अपयश आहे. यामुळे इतर ठिकाणी हिंसाचार उसळला, जो त्वरित आटोक्यात आणता आला नाही. दुसर्‍या बाजूने आपल्या देशात हिंदू बहुसंख्य असल्याने त्यांना ‘हिंदूंची हानी होत आहे’, असे म्हणण्याचा अधिकार मिळत नाही, हे उघड आहे. या भेदभावामुळे काही हिंदूंना चळवळ करून या हिंसाचाराचा प्रतिकार करावा लागत आहे.

तरीही अस्तित्वाच्या या लढ्यामध्ये तराजू एकाच बाजूने झुकलेला रहातो.’

(समाप्त)

लेखक : श्रीमॉय तालुकदार

(साभार : ‘एम्.एस्.एन्.’चे संकेतस्थळ)

संपादकीय भूमिका

धर्मांधांनी हिंदूंच्या विरोधात हिंसाचार भडकावण्याला इस्लामी आतंकवाद म्हणणे , म्हणजे इस्लामचा तिरस्कार असे नाही, हे लक्षात घ्या !