हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा !

नूंह येथे धर्मांधांकडून वाहनाची करण्यात येत असलेली हानी

१. भारतात हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा चालू झाल्याची चर्चा

‘एकमेकांशी काही संबंध नसलेल्या २ वेगवेगळ्या घटनांमध्ये हिंसाचार होऊन काहींचे मृत्यू झाले. त्यामुळे भारतामध्ये पुन्हा दोन धर्मांमध्ये फूट पडली. या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या; परंतु यापैकी एका घटनेचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याच्या ज्वाळा देशाच्या इतर भागांमध्येही पसरल्या. रेल्वे सुरक्षा दलातील एका हवालदाराने ‘जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस’मध्ये प्रवास करतांना त्याच्या स्वयंचलित बंदुकीतून गोळ्यांच्या १२ फैरी झाडल्या. त्यात त्याचा वरिष्ठ अधिकारी आणि इतर ३ जण ठार झाले. त्याच दिवशी हरियाणामधील नूंहमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात हिंदु अन् मुसलमान यांच्यामध्ये हिंसाचार झाला. तो सर्वत्र पसरून त्यामध्ये ६ व्यक्तींचा मृत्यू झाला. मृृत्यू झालेल्यांमध्ये २ होमगार्डचा समावेश आहे. या हिंसाचारामध्ये अनेक पोलीस घायाळ झाले. या घटनेनंतर १६५ लोकांना अटक करण्यात आली आणि ४ जिल्ह्यांमध्ये एकूण ८३ खटले प्रविष्ट करण्यात आले. या संख्येमध्ये अजून वाढ होऊ शकते. नूंह येथील हिंसाचार हा कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा, तसेच पोलिसांचे गुप्तचर खाते यांचे अपयश आहे. त्यामुळे हा हिंसाचार गुरुग्रामपर्यंत पसरला. एकमेकांशी संबंध नसलेल्या या हिंसाचार आणि रक्तपाताच्या घटना यांविषयी समाजात होणार्‍या चर्चांमधून भारतामध्ये हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा चालू झाला आहे, याला पुष्टी मिळते.

युरोपीय देशांमध्ये युरोपीय समाजाचे इस्लामीकरण होण्याच्या काळजीतून त्याच्या विरोधात चळवळ चालू आहे. ही वेगळी गोष्ट आहे; परंतु येथे हिंदु आणि मुसलमान यांच्यात सामाजिक चळवळ अन् प्रवचने ही आयुधे वापरून हत्या करण्याची स्पर्धा चालू आहे. हे केवळ दोन समाजांमधील विभाजन नाही. धार्मिक वर्तुळामधून सांगितले जाणारे अस्तित्ववादाचे सिद्धांत आणि त्यामुळे समाजामध्ये निर्माण झालेला तणाव राजकीय विचारसरणींमधील वर्तुळांमध्ये पसरला आहे. यामध्ये उजवे गट डाव्यांच्या (साम्यवाद्यांच्या) अस्तित्वाच्या राजकारणातून शिकत आहेत.

नूंह येथील हिंसाचाराच्या वेळी वाहनाजवळ लावलेली आग

२. उदारमतवादी हिंदूंच्या निष्क्रियतेचा मुसलमानांना लाभ

राजकीय पक्षांचे वर्तुळ, पारंपरिक प्रसारमाध्यमांतील समीक्षक, विचारवंत, सामाजिक माध्यमे, सामाजिक कार्यकर्ते, कृतीशील गट, सामाजिक आणि राजकीय प्रभाव असणारे या लोकांनी दोन्हीपैकी केवळ एका गटाची, म्हणजे धर्मांधांची बाजू लावून धरली आहे. हिंदु आणि मुसलमान यांमधील लढा हा समान पातळीवरील नाही. हिंदु आणि मुसलमान यांच्यामधील संघर्षामध्ये दोन्ही गटांतील हत्या होणार्‍यांची संख्या समांतर नाही. त्याला दोन कारणे आहेत. पहिले कारण, म्हणजे मुसलमानांचा हक्क (सध्या उदारमतवादी मुसलमान जवळजवळ अस्तित्वात नाहीत.) जो डाव्यांनी त्यांच्या बाजूने केलेल्या हस्तक्षेपामुळे बळकट झाला आहे. याउलट उदारमतवादी आणि सर्वधर्मसमभाव मानणारा हिंदु गट क्रियाशील नसल्याने त्यांच्या विरोधात द्वेष पसरवून त्याचे स्तोम माजवले जात आहे.

अशा विचित्र जमातीसाठी हिंदु धर्म आणि त्यातील श्रद्धा यांचे यात्रा स्वरूपातील बाह्य प्रदर्शन हे चिथावणी देणारे कृत्य ठरते. याउलट मुसलमान धर्माच्या संदर्भात हीच गोष्ट सामान्य ठरते. ही यात्रा मुसलमानबहुल भागातून काढली गेली, तर फसव्या द्वंद्वात्मक रितीने राज्यघटनेला मान्य नसलेली संकल्पना वैध ठरवली जाते. इस्लामी, साम्यवादी आणि निधर्मीवादी यांच्याकडून ही गोष्ट फिरवून सांगताना ‘हिंदू मुसलमानांना चिथावत आहेत’, अशी अफवा पसरवून हिंदूंना दोष दिला जातो. मुसलमानबहुल असलेला भाग म्हणणे, म्हणजे बुद्धीच्या पातळीवरील अप्रामाणिकपणा होय; कारण असे म्हटल्यास त्या जागेवर त्या जमातीला सार्वभौमत्व दिल्यासारखे होते आणि या ठिकाणी घटनेच्या कलम २५ नुसार घटनात्मक सूत्रे लागू पडत नाहीत, हा युक्तीवाद धोकादायक आहे. हीच गोष्ट उलट केली, तर ती आपत्तीजनक ठरते. ती हिंदूंच्या सहनशक्तीचे काही देणे लागत नाही. असहिष्णु असणारा शेजारी देश अल्पसंख्यांकांना वाळवंटातील हिरवळीप्रमाणे वाटतो. हे या विधानामागचे सत्य आहे. तरीही अल्पसंख्यांक जमातींना हाताळण्याविषयी भारताच्या विरोधात सतत प्रचार केला जातो. (यामध्ये पाश्चिमात्य प्रसारमाध्यमे नेतृत्व करतात.) पाश्चिमात्य देशांमध्ये असमान राजकीय शक्तींचा मुसलमान लाभ करून घेतात.

३. मुसलमानांकडून स्वत:ची ‘व्हिक्टीमहूड’ प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न !

‘ग्रुमिंग गँग

(‘व्हिक्टीमहूड’ म्हणजे नेहमीच मुसलमानांना फसवले जात असल्याचे रडगाणे)

हिंदु आणि मुसलमान यांच्या अस्तित्वाच्या लढ्यामध्ये दुसरा एक पैलू, म्हणजे मुसलमान ‘व्हिक्टीमहूड’ अस्तित्वाच्या राजकारणाच्या जगात मुसलमानांची ही मानसिकता संस्थात्मक, शाश्वत आणि अगम्य आहे. उदारमतवादी पाश्चिमात्यांनी मान्यता दिल्याने आणि त्याला जागतिक स्तरावर वाढवल्याने या मुसलमानांच्या मानसिकतेमुळे सर्व प्रकारची नैतिक अन् कायद्याची उल्लंघने आणि धर्मशास्त्रीय वर्चस्व कायदेशीर ठरवली गेली आहेत. यामुळे ही जमात ‘इस्लामोफोबिया’ (इस्लामची भीती वाटणे)चे भूत पाहून नपुंसक बनलेल्या सार्वभौम राष्ट्रांकडून विशेष सवलती मिळवत आहे. उदाहरणार्थ ब्रिटनमध्ये ‘ब्रिटीश पाकिस्तानी हे कुप्रसिद्ध असलेल्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या ‘ग्रुमिंग गँग’चे (लव्ह जिहाद करणारी टोळी) सदस्य आहेत’, असे म्हणणे निषिद्ध आहे. मुसलमान भडकतील, या भीतीने आणि त्यांची ‘व्हिक्टीमहूड’ मानसिकता यांमुळे ब्रिटीश राजकारणी, प्रसिद्धीमाध्यमे आणि नागरिक हे राजकारणात सुधारणा करण्यासाठी पर्यायी मार्ग निवडत आहेत.

या दोन गोष्टी एकत्र झाल्याने मुसलमानांकडून पसरवल्या जाणार्‍या अफवांची तीव्रता ही एवढी अधिक प्रमाणात आहे की, वादग्रस्त जागेत प्रत्यक्ष वस्तूस्थितीची काळजी न करता वातावरण निर्माण करण्याविषयी मुसलमान जमातीचे वर्चस्व आहे.

४. बहुसंख्य असतांनाही शांतता राखण्याचे दायित्व हिंदूंकडेच !

मुसलमानांच्या अशा कोणतीही तडजोड न करण्याच्या स्थितीमुळे मुसलमानांच्या कृतीला कुणीही दोष देत नाही आणि त्यामुळे तडजोड करण्याचे उत्तरदायित्व दुसर्‍या बाजूकडे रहाते. या कृती हिंदू करत असतील किंवा हिंदूंचे अस्तित्वही त्यांना चिथावणी देणारे ठरू शकते. उदा. बजरंग दलाने आयोजित केलेली धार्मिक यात्रा मुसलमानबहुल भागातून काढल्याविषयी बजरंग दलालाच दोष दिला जाईल. पूर्वसिद्धता करून हिंसाचारामध्ये सहभागी झालेल्या धर्मांधांवर या हिंसाचाराचे दायित्व नाही. ‘चिथावणी देणे’, या शब्दामुळे आक्रमण करणार्‍यांना (धर्मांधांना) रस्त्यावर येण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे ते निर्दाेष आहेत’, असा नैतिक युक्तीवाद करण्यास मुभा मिळते. ‘शांतता राखणे’, हे नेहमी हिंदूंचे उत्तरदायित्व समजले जाते. याउलट अन्य धर्मीय नेहमीच त्यांना फसवले जात असल्याची भूमिका घेत असतात.

(क्रमशः)

लेखक : श्रीमॉय तालुकदार

(साभार : ‘एम्.एस्.एन्.’चे संकेतस्थळ)

संपादकीय भूमिका

पूर्वसिद्धता करून हिंसाचार करणार्‍या धर्मांधांवर त्याचे दायित्व नसणे, यातून हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दिसून येते !