मंदिरांचे सरकारीकरण करून ती चालवणारे तमिळनाडू सरकार ‘सनातन धर्मा’ची मंदिरेही नष्‍ट करणार का ? – गायत्री एन्., संस्‍थापिका, ‘भारत व्‍हॉईस’

तमिळनाडूमध्‍ये अतिक्रमणाच्‍या नावाने हिंदूंची पुरातन मंदिरे तोडली जात आहेत; मात्र चर्च किंवा मशीद यांना हातही लावला जात नाही. तमिळनाडूमध्‍ये मंदिरांचे सरकारीकरण झालेले आहे आणि मंदिरे चालवणारे सरकारमधील मंत्री सनातन धर्म नष्‍ट करू पहात आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंच्या मंदिरांची दुःस्थिती !

व्यावसायिकीकरणामुळे हिंदु समाजाची नीतीमूल्ये हरवली आणि तो शक्तीहीन झाला, तसेच हिंदूंची मंदिराविषयी असणारी निष्ठा नष्ट करण्यात आली. त्यामुळे परिस्थिती धर्मांतराला पोषक बनली.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या ‘१०८ भक्तनिवास’ इमारतीत गळती !

भक्तांच्या पैशांतूनच उभारण्यात येणार्‍या इमारतीचे बांधकाम चांगल्या दर्जाचे होत नसेल, तर सरकारीकरण झालेल्या श्री तुळजाभवानी मंदिराचा अन्य कारभार सुरळीत असेल का ?

दादर येथे सिद्धिविनायकाच्‍या ऑनलाईन दर्शनाच्‍या नावाखाली पैसे उकळणारा अटकेत !

‘कोणत्‍याही ‘अ‍ॅप’च्‍या माध्‍यमातून नोंदणी करू नये. नोंदणी करतांना सिद्धिविनायक मंदिर संस्‍थानच्‍या अधिकृत संकेतस्‍थळाला भेट द्यावी’, असे आवाहन ट्रस्‍टच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आले आहे.

श्री तुळजाभवानीदेवीचे दागिने गहाळ झाल्याच्या प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांनी भूमिका स्पष्ट करावी ! – किशोर गंगणे, माजी अध्यक्ष, पुजारी मंडळ

‘मंदिरांमध्ये भ्रष्टचार चालतो’, अशी कारणे पुढे करून मंदिरांचे सरकारीकरण केले जाते; पण कालांतराने सरकारीकरण झालेल्या मंदिरांत भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यावर मात्र आळीमिळी गूपचिळी साधली जाते !

विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर सरकारमुक्‍त होण्‍याविषयी मुंबई न्‍यायालयाने राज्‍य सरकारचे म्‍हणणे मागवले !

सर्वत्रची मंदिरे सरकारच्‍या कह्यातून मुक्‍त होण्‍यासाठी हिंदूंनी संघटितपणे वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्‍यक !

तिरुमला तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती व्यक्तीच्या नियुक्तीवरून वाद !

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! हिंदूंना अतिशय पूजनीय असणार्‍या देवस्थानच्या मंदिराचे अध्यक्षप ख्रिस्त्याला बहाल करण्याचा निर्णय घेण्याचे धारिष्ट्य वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकार दाखवतेच कसे ? हे हिंदूंना लज्जास्पद !

मंदिरे अधिग्रहण करू नये, या विचाराचे आमचे सरकार आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवस्थानची नावलौकिकता पहाता व्यवस्थापन समितीकडून होणारा भ्रष्टाचार न सांगण्यासारखा आहे. देवस्थानच्या मालकीच्या मिळकतीमध्ये होणारा भ्रष्टाचार, जंगम आणि स्थावर मालमत्तेचा होणारा अपवापर रोखण्याची आवश्यकता आहे.

श्री तुळजाभवानीदेवीच्‍या गहाळ अलंकारांविषयी चौकशी व्‍हावी !

देवीच्‍या दागिन्‍यांची मोजणी ‘ऑन कॅमेरा’ करावी, अशी मागणी करावी लागणे, हे लज्‍जास्‍पद आहे. मंदिरांचे सरकारीकरण झाल्‍यामुळेच देवीचे दागिने चोरीला जात आहेत. यासाठी मंदिरांचे विश्‍वस्‍त भक्‍तच हवेत !

देशातील सर्व मंदिरांचे एकत्रीकरण देशाला समृद्ध बनवू शकते ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

मंदिरांचे सरकारीकरण रहित करून ती भक्तांच्या नियंत्रणात देण्याची मागणी या महासंमेलनातून केली पाहिजे, तसेच प्रत्येक मंदिरांत हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्याची व्यवस्था केली पाहिजे !