श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या ‘१०८ भक्तनिवास’ इमारतीत गळती !

इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप  

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने बांधलेल्या ‘१०८ भक्तनिवास’ इमारतीच्या छताची गळती होत आहे. ही गळती थांबवून त्याच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निविदा काढण्यात यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र साळुंके हे ४ सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. (अशी मागणी का करावी लागते ? मंदिर प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही का ? – संपादक)  

रवींद्र साळुंके यांनी याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘१०८ भक्तनिवासा’चे संपूर्ण बांधकाम अतीनिकृष्ट दर्जाचे झालेले असून सर्व मजल्यांवरील भिंतींमध्ये पावसाचे पाणी मुरत आहे. त्यामुळे इमारतीच्या भिंतींना ओल आली आहे. ही इमारत भक्तांना रहाण्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका

भक्तांच्या पैशांतूनच उभारण्यात येणार्‍या इमारतीचे बांधकाम चांगल्या दर्जाचे होत नसेल, तर सरकारीकरण झालेल्या श्री तुळजाभवानी मंदिराचा अन्य कारभार सुरळीत असेल का ? असा प्रश्‍न कुणाला पडल्यास नवल ते काय ?