छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आंदोलनाची चेतावणी

कोल्हापूर – भाविक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री तुळजाभवानीमातेला अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंची मोजणी पूर्ण होऊन ३ सप्ताह झाले आहेत. यामध्ये काही अलंकार गहाळ झाल्याविषयी चौकशी व्हावी, अशी मागणी कोल्हापूर छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी श्री तुळजाभवानी देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
तुळजाभवानी देवीच्या गहाळ दागिन्यांची चौकशी करा : संभाजीराजे https://t.co/JniSqMXYoo #tuljabhavani #kolhapur #sambhajirajeChatrapati #pudharionline
— Pudhari (@pudharionline) July 25, 2023
या पत्रात म्हटले आहे की, सखोल चौकशी करून त्याविषयीचा सविस्तर अहवाल सार्वत्रिक करावा. अन्यथा या अपप्रकाराविषयी स्वराज्य पक्षाच्या वतीने मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल. यापुढे श्री भवानीदेवीच्या अलंकारांची मोजणी ‘ऑन कॅमेरा’ करावी. (देवीच्या दागिन्यांची मोजणी ‘ऑन कॅमेरा’ करावी, अशी मागणी करावी लागणे, हे लज्जास्पद आहे. मंदिरांचे सरकारीकरण झाल्यामुळेच देवीचे दागिने चोरीला जात आहेत. यासाठी मंदिरांचे विश्वस्त भक्तच हवेत ! – संपादक)
वेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
संपादकीय : ‘तत्त्व’ विसरलेला पुरातत्त्व विभाग !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द