मंदिरांचे सरकारीकरण करून ती चालवणारे तमिळनाडू सरकार ‘सनातन धर्मा’ची मंदिरेही नष्‍ट करणार का ? – गायत्री एन्., संस्‍थापिका, ‘भारत व्‍हॉईस’

गायत्री एन्., संस्‍थापिका, ‘भारत व्‍हॉईस’

स्‍वत:ला ख्रिस्‍ती मानणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलीन यांना सनातन धर्म नष्‍ट करायचा आहे; पण द्रविड विचारधारेवर चालणार्‍या तमिळनाडू सरकारला तेथील जातीयवाद मिटवता आलेला नाही. उलट तो अधिक वाढलेला आहे. तमिळनाडूमध्‍ये अतिक्रमणाच्‍या नावाने हिंदूंची पुरातन मंदिरे तोडली जात आहेत; मात्र चर्च किंवा मशीद यांना हातही लावला जात नाही. तमिळनाडूमध्‍ये मंदिरांचे सरकारीकरण झालेले आहे आणि मंदिरे चालवणारे सरकारमधील मंत्री सनातन धर्म नष्‍ट करू पहात आहे. असे सरकार हिंदूंची मंदिरे चालवणार कि ती नष्‍ट करणार ?