दोषी अधिकार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या संभाजीनगर खंडपिठामध्‍ये सरकारीकरण झालेल्‍या तुळजापूर देवस्‍थानातील घोटाळ्‍यांच्‍या संदर्भात, तसेच देवीचे अलंकार गहाळ झाल्‍याविषयी याचिका प्रविष्‍ट केली होती.

श्री भवानीदेवीच्‍या अलंकारांची पडताळणी करण्‍याचे जिल्‍हाधिकार्‍यांचे आदेश !

श्री तुळजाभवानीदेवीच्‍या अलंकारांमध्‍येच अपहार होत असेल, तर मंदिराच्‍या कारभारात किती गलथानपणा असेल ?’, याचा अंदाज यावरून येतो. त्‍यामुळे मंदिरे ही सरकारीकरणातून मुक्‍त करून भक्‍तांच्‍याच कह्यात द्यायला हवीत !

श्री भवानीदेवीचे शिवकालीन अलंकार गायब झाल्‍याचे उघड !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्‍याचा दुष्‍परिणाम ! देवीचे मौल्‍यवान दागिने सांभाळून ठेवायलाही न जमणारे अकार्यक्षम सरकारी विश्‍वस्‍त !

धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून प्राचीन परंपरा पालटण्‍याचा प्रयत्न करतात !

मंदिरांचे धन मंदिरांसाठी किंवा हिंदु धर्मासाठीच वापरण्‍यात यावे. भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून त्‍यातील धन घेण्‍याचा किंवा मंदिरांतील प्राचीन परंपरा पालटण्‍याचा प्रयत्न करतात

श्री तुळजाभवानीमातेच्या अभिषेक पूजेचे शुल्क ५० वरून ५०० रुपये !

मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम होय. मंदिरांच्या संदर्भात योग्य निर्णय होण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यातच हवीत !

सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सोहळ्यात सनातनच्या वक्त्यांनी ‘संवैधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचा संकल्प करा’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर मान्यवरांनी त्यांचे विचार मांडले. या वेळी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली, तसेच फ्लेक्स आणि सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

प्रत्‍येक मंदिर सरकारीकरणातून मुक्‍त होईपर्यंत लढा चालूच ठेवू ! – सुनील घनवट, समन्‍वयक, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ

तुळजापूर येथील श्री भवानीदेवी मंदिरातील वस्‍त्रसंहिता (मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्‍या कपड्यांच्‍या संदर्भातील नियमावली) प्रकरणाच्‍या नंतर महाराष्‍ट्र राज्‍यात १३१ मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू करण्‍यात आली आहे आणि आता ही वस्‍त्रसंहिता सर्व मंदिरांमध्‍ये लागू करायची आहे.

‘संगम टॉक्स’ च्या माध्यमातून आम्ही हिंदु धर्मावरील आघातांना वाचा फोडत आहोत ! – श्रीमती तान्या मनचंदा, संपादक, संगम टॉक्स

आमच्या पिढीला विशेषतः शहरी युवकांना धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे आमचे दुर्भाग्य आहे; परंतु ‘संगम टॉक्स’ या यू-ट्युब वाहिनीच्या (‘चॅनेल’च्या) माध्यमातून युवकांना आम्ही हिंदुत्वाविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहोत. असे मत त्यांनी व्यक्त केले

मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा देणार ! – वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

वस्त्रसंहिता लागू करण्यासह यापुढे मंदिर परिसर स्वच्छ आणि सात्त्विक रहावा, यासाठी तो ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा दिला जाईल, असा निर्धार महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कोअर समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली.

तमिळनाडूमधील हिंदुविरोधी कारवायांना सरकारी पाठिंबा ! – श्री. अर्जुन संपत, संस्थापक अध्यक्ष, हिंदू मक्कल कत्छी, तमिळनाडू

तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुविरोधी कारवाया चालू असल्या, तरी तमिळनाडू ही मूळ हिंदूंची पुण्यभूमी आहे. नवीन संसदेमध्ये नेण्यात आलेला ‘सांगोल’ (धर्मदंड) या भूमीतूनच नेण्यात आला.