गोव्यात ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता

हिंदूंवरील अत्याचाराला वाचा फोडणारा चित्रपट करमुक्त करणार्‍या गोव्यातील भाजप शासनाचे अभिनंदन !

शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट

प्रतापसिंह राणे यांना मंत्रीपदाचा दर्जा दिल्यास त्यांच्या दिमतीला १२ कर्मचारी द्यावे लागणार असून त्यांच्यावर प्रतिवर्ष ९० लाख रुपयांचा आर्थिक बोजा सरकारी तिजोरीवर पडणार असल्याचा याचिकाकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांचा दावा आहे.

गोव्यात नव्या मोटर वाहन कायद्याच्या भीतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन ९० टक्के अल्प

नव्या मोटर वाहन कायद्यानुसार नियमांचे उल्लंघन केल्यास होणार्‍या दंडाची रक्कम वाढवण्यात आल्याने ‘अधिक रकमेचा दंड भरावा लागेल’, या भीतीने वाहतूक नियमांचे होणारे उल्लंघन ९० टक्के न्यून झाले आहे.

म्हापसा येथील गणेशपुरी विश्‍वस्त मंडळावरून सलीम इसानी यांनी दिले त्यागपत्र

मुसलमान असल्याच्या सूत्रावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर येथील उद्योजक सलीम इसानी यांनी गणेशपुरी, म्हापसा येथील श्री गणेशपुरी विश्‍वस्त मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे.

उद्योगाचा विस्तार करण्यासाठी काही पंचायती लाच मागत असल्याने सरकारने उद्योगांसाठी ‘एक खिडकी’ योजना राबवावी ! – दामोदर कोचकर, अध्यक्ष, गोवा राज्य औद्योगिक संघटना

दामोदर कोचकर यांना अशी मागणी करावी लागणे, यावरून राज्यात भ्रष्टाचार किती तळागाळात पसरला आहे ? हे लक्षात येते !

गोव्याच्या राज्यपालांच्या नावाने भामट्यांकडून अनेक पत्रकारांकडे पैशांची मागणी

गोव्याचे राज्यपाल पी.एस्.श्रीधरन् पिल्लई यांच्या नावाने २२ एप्रिल या दिवशी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून राज्यात अनेक पत्रकारांकडे पैशांची मागणी करण्यात आली. गुन्हे अन्वेषण विभागाने या घटनेच्या अन्वेषणाला प्रारंभ केला आहे.

‘पी.एफ.आय.’वर गोव्यात बंदी घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री, गोवा

कट्टर जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (‘पी.एफ.आय.’वर) बंदी घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गोव्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्या !

उदगीर येथील मराठी साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ‘गोव्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्यावा’, अशी जोरदार मागणी त्यांच्या भाषणात केली.

(म्हणे) ‘गोव्यात कुठल्या चर्चमध्ये धर्मांतर केले जाते ? हे मला दाखवा !’

मायकल लोबो यांची पत्नी आमदार असलेल्या शिवोली मतदारसंघातच धर्मांतर होत आहे ! याविषयी अंकित साळगांवकर यांनी न्यायालयात पुराव्यांसह याचिका प्रविष्ट केली आहे.

कणाकणात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निर्गुण तत्त्वाची अनुभूती देणारा आणि सर्वांवर चैतन्याची उधळण करणारा दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा !

साधक, वाचक आणि जिज्ञासू यांच्यावर चैतन्याची उधळण करणाऱ्या या सोहळ्यात सर्वत्र गुरुदेवांचेच अस्तित्व निर्गुण तत्त्वरूपाने पुष्कळ प्रमाणात जाणवले !