गोव्यात ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता

मंत्रीमंडळाच्या बैठकीत चित्रपट करमुक्त करण्याच्या प्रस्तावाला सर्वांची मान्यता

पणजी, २७ एप्रिल (वार्ता.) – काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणारा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वी केली होती. आता २७ एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चित्रपट करमुक्त करण्याच्या प्रस्तावाला सर्वांनी मान्यता दिली. त्यामुळे आतापर्यंत तिकिटांवर आकारण्यात आलेला ‘वस्तू आणि सेवा कर’ (जी.एस्.टी.) चित्रपट निर्मात्यांना परत करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काही दिवसांपूर्वी ट्वीट केले होते, ‘काश्मिरी हिंदूंनी भोगलेल्या यातना आणि त्यांनी दिलेला लढा प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे. यामुळेच अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट जेवढा अधिक काळ दाखवता येईल, तेवढे दिवस तो दाखवावा’, अशी सूचना मी ‘आयनॉक्स’ चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला केली आहे.’

संपादकीय भूमिका

हिंदूंवरील अत्याचाराला वाचा फोडणारा चित्रपट करमुक्त करणार्‍या गोव्यातील भाजप शासनाचे अभिनंदन !