काणकोण तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती

आदिव्हाळ येथे पाण्याचा विसर्ग सुरळीत होण्यासाठी हल्लीच लाखो रुपये खर्चून नाल्याचा गाळ उपसण्यात आला आहे, तर नाल्याचे बांधकाम करून नाल्याची रूंदीही वाढवण्यात आली आहे

पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या नूतन मराठी ग्रंथाचे प्रकाशन !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे ज्येष्ठ बंधू तथा सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांच्या ८६ व्या वाढदिवसाचा कार्यक्रम आणि त्यांनी लिहिलेल्या ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या नूतन मराठी ग्रंथाचे प्रकाशन चैतन्यमय वातावरणामध्ये झाले.

गोव्यात अमली पदार्थांची विक्री करणार्‍यांविरुद्ध पी.आय.टी.एन्.डी.पी.एस्. कायदा लागू करण्याविषयी पोलिसांकडून गृहखात्याकडे प्रस्ताव

यासंबधी अमली पदार्थ विरोधी विभागाचे पोलीस अधीक्षक महेश गावकर म्हणाले, ‘‘आम्ही हा कायदा लागू करण्याविषयीचा प्रस्ताव गृहखात्याकडे पाठवला आहे. हा कायदा कडक असल्याने अमली पदार्थांच्या विक्रीला आळा बसू शकतो.

नावेली येथे भटक्या कुत्र्यांचे ८ वर्षीय मुलीवर आक्रमण

राज्यात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नावेली परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या खूप वाढली असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी स्थानिकांकडून मागणी करण्यात येत आहे.

खाण महामंडळ विधेयक संमतीसाठी राज्यपालांकडे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ते म्हणाले, ‘‘खाण महामंडळ स्थापन होऊ लागले आहे. राज्यपालांकडून विधेयक संमत होऊन आल्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.

गोव्यात ५ सप्टेंबरपासून मुसळधार पावसाची शक्यता

श्री गणेशचतुर्थीच्या काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यापुढील काही दिवस पावसाचा जोर वाढेल; मात्र तो कधी ओसरेल याविषयी कोणताच अंदाज वेधशाळेने वर्तवलेला नाही.

सिद्धी नाईकचा खून झाला असल्याचा वडिलांना संशय : नव्याने तक्रार नोंद

‘माझ्या मुलीला बलपूर्वक पाण्यात बुडवून तिची हत्या करण्यात आली आहे’, असे संदीप नाईक यांनी कळंगुट पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

कोरोना महामारीतील संचारबंदीमुळे कदंब परिवहन महामंडळाला आर्थिक फटका

४१७ बसगाड्या बंद ठेवल्याने प्रतिदिन २० लाख रुपयांची हानी सोसावी लागली !

१६ सहस्र लिटरपेक्षा अधिक पाणी वापरल्यास पूर्ण देयक लागू होईल ! – सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अधिसूचना प्रसारित

प्रत्येक कुटुंबाला मासिक १६ सहस्र लिटर विनामूल्य पाणीपुरवठा करण्याची योजना १ सप्टेंबरपासून चालू करण्यात आली; मात्र १६ सहस्र लिटरपेक्षा अधिक पाणी वापरल्यास पूर्ण देयक भरावे लागणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रसारित केलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

गोवा राज्यात ‘डेल्टा प्लस’चा पहिला रुग्ण सापडला

पुण्यातील जिनोम सिक्वेंसिंग लॅबकडून गेल्या आठवड्यात मिळालेल्या अहवालामुळे त्या रुग्णाला ‘डेल्टा प्लस’चा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.