दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात प्रारंभ !

‘जयतु जयतु हिंदु राष्ट्रम्’, ‘हर हर महादेव’, अशा जयघोषात येथील श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी परशुरामभूमी सज्ज !

गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातील मान्यवरांचे गोव्यात आगमन झाले असून फोंडानगरीचे वातावरण भगवेमय झाले आहे.

छत्रपती शिवरायांप्रमाणे गोव्यात विध्वंस केलेल्या मंदिरांचे पुनर्निर्माण होण्यासाठी हिंदु राष्ट्र अधिवेशनात धोरण ठरणार ! – हिंदु जनजागृती समिती

‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा येथे होणार्‍या दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त गोव्यासह देशातील विध्वंस करण्यात आलेल्या मंदिरांविषयी चर्चा होणार !

इस्लामिक देशांच्या भारतविरोधाला तोंड देण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

या अधिवेशनाला आतापर्यंत देशभरातील ५८ हून अधिक हिंदु संघटना, संप्रदाय, विद्यापिठे, अधिवक्ता संघटना, पत्रकार, उद्योजक आदींनी पाठिंबा दर्शवला आहे.

वाहनकर वसुलीसाठी पास्टर (पाद्री) डॉम्निक याला नोटीस

धर्मांतर करून पैसे कमावणारा पाद्री डॉम्निक याला सरकारने कठोरातील कठोर शिक्षा करायला हवी ! त्याने आतापर्यंत जमवलेल्या संपत्तीचीही कसून चौकशी झाली पाहिजे !

गोवा : मोपा विमानतळावर १ सप्टेंबरपासून विमाने उतरणार

गोवा राज्य सरकार आणि ‘जीएम्आर् गोवा’ विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी कटीबद्ध आहे. राज्यातील युवकांनी खासगी क्षेत्रांतील नोकरीच्या संधीचा लाभ करून घ्यावा, अन्यथा परराज्यांतून येणारे या संधीचा लाभ उठवतील.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी संतांकडून देवतांच्या चरणी प्रार्थना !

फोंडा (गोवा) येथे १२ जून या दिवशी ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’स आरंभ होत आहे. हे अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी येथील श्री शांतादुर्गादेवी अन् श्री देव रामनाथ यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीकडून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना १२ जूनपासून चालू होणाऱ्या दशम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले.

हिंदुहितैषी निर्णय स्वागतार्ह !

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदुहितैषी निर्णयांचा जो धडाका लावला आहे, तो प्रत्येक हिंदूला हर्षाेल्हासित करणारा आहे. हे निर्णय होऊ न देण्यासाठी अनेक विरोधक आटापिटा करतील. अर्थात् हिंदूंनीही मुख्यमंत्र्यांच्या मागे ठामपणे उभे रहाण्याचे दायित्व पार पाडावे. हे त्यांचे धर्मकर्तव्यच आहे !

गोव्यातील अनेक ‘मसाज पार्लर’ अवैध !

गोव्यातील अनेक ‘मसाज पार्लर’ (मर्दन करण्याचे ठिकाण) अवैध असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या माहितीनुसार गोव्यात कार्यरत असलेले ‘मसाज पार्लर’ची सरकार दरबारी नोंदणी करतांना वेगळ्या नावाने करण्यात आली आहे.