हिंदु जनजागृती समितीकडून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण

सांखळी (गोवा) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना १२ जूनपासून श्री रामनाथ देवस्थान सभागृह, रामनाथी, फोंडा येथे चालू होणाऱ्या दशम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले.

दशम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (डावीकडे) यांना देतांना श्री. रमेश शिंदे आणि समवेत श्री. गोविंद चोडणकर

अधिवेशनाला आवर्जून उपस्थित रहाण्याची विनंती करण्यासमवेतच त्यांना अधिवेशनाविषयी माहिती देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळामध्ये उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर आणि श्री. नारायण नाडकर्णी यांचा सहभाग होता.