वाहनकर वसुलीसाठी पास्टर (पाद्री) डॉम्निक याला नोटीस

पणजी – अवैध धर्मांतर प्रकरणी जामीन मिळालेला ‘बिलिव्हर्स’चा पास्टर (पाद्री) डॉम्निक डिसोझा याला राज्यशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. धर्मादाय संस्थांना दिली जाणारी करसवलत वर्ष २०१४ मध्ये डॉम्निकने ‘मर्सिडिज’ हे महागडे वाहन खरेदी केले, त्यासाठी देण्यात आली होती. या सवलतीविषयी राज्याच्या वाहतूक संचालनालयाने ही नोटीस बजावली आहे. वाहनकराची ९ लाख ८० सहस्र रुपयांची रक्कम वसूल करण्याची प्रकिया चालू करण्यात आली आहे. या संदर्भातील सुनावणी ८ जून या दिवशी वाहतूक संचालकांच्या कार्यालयात होणार आहे.

या नोटिसीत म्हटले आहे की, ‘धर्मादाय संस्थांना दिली जाणारी करसवलत वर्ष २०१४ मध्ये डॉम्निक याला ‘मर्सिडिज बेंझ’ या वाहन खरेदीच्या वेळी देण्यात आली होती. कायदा खात्याच्या मतानुसार, अशा प्रकारचे आलीशान वाहन सेवाभावी संस्थेसाठी आवश्यक नसते. त्यामुळे रस्ता कर सवलतीविषयी काढलेली अधिसूचना मागे घेणे आवश्यक आहे. (आलीशान वाहन खरेदीवर सवलत देणार्‍या वाहतूक अधिकार्‍यांचीही चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करायला हवी ! या अधिकार्‍यांनी सवलत देतांना कायदा खात्याचे मत घेतले नव्हते का ? कि ते डॉम्निकच्या कृत्यांमध्ये सहभागी होते ? याचीही चौकशी झाली पाहिजे ! – संपादक) ही सूचना मागे का घेतली जाऊ नये, या संदर्भात ७ दिवसांत लेखी स्वरूपात कारण सादर करावे.

डॉम्निक रुग्णालयात भरती

ताप आल्यामुळे पास्टर डॉम्निक याला ८ जून या दिवशी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच्यावर उपचार चालू आहेत. (आजार बरे करण्याचे आमीष दाखवून हिंदूंचे धर्मांतर करणारा पास्टर डॉम्निक स्वतःच कसा आजारी पडतो ? यावरून त्याचे खरे स्वरूप आणि धंदा उघड होतो ! – संपादक)

संपादकीय भूमिका

धर्मांतर करून पैसे कमावणारा पाद्री डॉम्निक याला सरकारने कठोरातील कठोर शिक्षा करायला हवी ! त्याने आतापर्यंत जमवलेल्या संपत्तीचीही कसून चौकशी झाली पाहिजे !