पणजी हे गोव्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर

देशातील ३८९ प्रदूषित शहरांच्या सूचीमध्ये पणजी शहराचा २३० वा क्रमांक लागतो. ‘पी.एम्.१०’चे प्रमाण ३१९ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर असलेले हरियाणामधील सोनेपत शहर हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.

अवैध कुपनलिका खोदण्‍यात येत आहेत, हे प्रशासन आणि पोलीस यांना कळत नाही का ?

अवैधरित्‍या कुपनलिका प्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या गोवा खंडपिठाने सरकारच्‍या कारभारावर ताशेरे ओढतांना सरकारकडे ‘या प्रकरणी कारवाई का केली नाही ?’, याचे स्‍पष्‍टीकरण मागितले आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक

म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटककडून दादागिरी चालू आहे. यावरून गोमंतकीय पेटून उठलेले असतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कर्नाटक येथे जाऊन ‘विद्यमान भाजप सरकारच सत्तेवर आले पाहिजे’, असे सांगत आहेत.

गोवा मुक्तीलढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली निवर्तले !

नागेश करमली यांचा कोकणी भाषा मंडळाच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा होता. गझल हा प्रकार त्यांनी कोकणीत रूजवला. त्यांनी मराठी वर्तमानपत्रातही स्तंभलेखन केले आहे.

शॅकधारकांकडून समुद्रकिनार्‍यांवर अवैधरित्या कुपनलिका आणि शौचालयांचे ‘सोक पिट’

कांदोळी आणि कळंगुट किनारपट्टी भागांत मोठ्या प्रमाणावर पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. कुपनलिका खोदल्याने आणि शौचालयाचे शोष खड्डेही खोदल्याचे आढळून आले आहे.

सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ संघटनेची राज्यपालांकडे मागणी

म्हादई अभयारण्य व्याघ्र राखीव क्षेत्र घोषित करण्याची आवश्यकता नाही. म्हादईप्रश्नी गोव्याची न्यायालयीन बाजू भक्कम आहे आणि म्हादईप्रश्नी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.- देविया राणे

म्हादई नदीचे पाणी वळवल्याने गोव्यावर होणार्‍या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार मंडळ नेमले जाणार !

गोवा सरकारने याचिकेत म्हादई वन्यजीव अभयारण्य, म्हादई आणि भीमगड अभयारण्य येथील पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाची सूत्रे मांडली आहेत.

पणजी येथे तिरंग्याचा अवमान

एका व्यक्तीला सकाळी चालतांना तिरंगा रस्त्यावर पडलेला आणि तो एका मृत उंदराला गुंडाळण्यासाठी वापरल्याचे आढळून आले होते. यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी तिरंग्याचा अवमान झाल्याविषयी चलचित्र प्रसारित केले.

दीर्घ पल्ल्याच्या २ रेल्वेगाड्या काणकोण येथे थांबा घेणार ! – रमेश तवडकर, सभापती

दीर्घ पल्ल्याच्या २ रेल्वेगाड्या लवकरच काणकोण येथे थांबा घेणार असल्याचे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांनी दिले आहे.

पिळये, धारबांदोडा येथील श्री भूमिकादेवीच्या मंदिरात चोरी

चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशदाराचा हुक तोडून मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील सुट्या पैशांची अर्पणपेटी फिरवून ठेवली, तर दुसरी नोटा असलेली अर्पणपेटी फोडून आतील रोख रक्कम पळवली आहे.