ब्रिटनच्या पंतप्रधानांचे कुटुंब पर्यटनासाठी गोव्यात

मडगाव, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती सध्या पर्यटनाच्या निमित्ताने कुटुंबियांसमवेत गोव्यात आल्या आहेत. बाणावली येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य आहे.


UK फर्स्ट लेडी अक्षता मूर्ती , तिचे वडील नारायण मूर्ती गोव्यात सुट्टी घालवताना

बाणावली किनार्‍यावर काही पत्रकारांनी अक्षता मूर्ती यांची भेट घेतली असता त्या म्हणाल्या, ‘‘गोवा पुष्कळ सुंदर आहे. येथील वातावरण मला पुष्कळ आवडते. आम्ही सुट्टीत निवांतपणा अनुभवण्यासाठी येथे आलो आहोत.’’