छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, ओडिशा, बंगाल या राज्यांसह इतर ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये या वर्षी अल्प पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली असून त्यासाठी केंद्र सरकार सिद्धता करत आहे. केंद्र सरकारने कृषी, खाद्य, ग्रामीण विकास, जलशक्ती आणि वित्त मंत्रालयांचा एक ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याच्या हालचाली चालू केल्या आहेत. उपाययोजनांची चाचपणी चालू आहे.
जून ते सप्टेंबरमध्ये राज्यात खंडित पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव, राहुरी, कराड, अकोला, पाडेगाव आणि शिंदेवाही (चंद्रपूर) परिसरात पावसात खंड असेल. दापोली, पुणे, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, निफाड, सोलापूर, परभणी परिसरात पावसातील खंड अल्प असेल, असा अंदाज हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला होता. तो खरा होण्याची शक्यता आहे.