गोवा राज्यात मागील ९ वर्षे सरासरी प्रत्येक आठवड्याला ५ महिला आणि लहान मुले अत्याचाराला बळी पडल्या आहेत. पीडितांवर लैंगिक आणि शारीरिक अत्याचार करण्यात आले, तसेच त्यांच्या विरोधात अपशब्द वापरण्यात आले. राज्य सरकारच्या पीडित साहाय्य केंद्राच्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. या केंद्राने वर्ष २०१४ पासून अत्याचाराची एकूण २ सहस्र ७३४ प्रकरणे हाताळली आहेत आणि यामधील ७० टक्के प्रकरणे ही महिलांशी निगडित आहेत, तसेच अहवालानुसार पीडित मुलांपैकी निम्मी मुले ही १५ वर्षे किंवा त्याहून अल्प वयोगटांतील आहेत.