कराड येथील प्राचीन मंदिर परिसरातील कचरा त्‍वरित हटवण्‍यात यावा ! – स्‍थानिक भक्‍तांची मागणी

असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासनाला दिसत नाही का ? कि प्रशासन कर्तव्‍यचुकारपणा करत आहे, हे वरिष्‍ठ अधिकार्‍यांनी पहाणे आवश्‍यक !

कचरा प्रश्न सोडवा, नंतर बांधकामे उभारा ! – गोवा खंडपिठाचा आदेश

कचरा समस्येवरून न्यायालयाने नगरपालिकेला असे फटकारावे लागणे मडगाव पालिकेला लज्जास्पद ! अशासकीय संस्थांना गंभीर प्रकरणांची नोंद घेऊन न्यायालयात धाव घ्यावी लागते. हीच गोष्ट पालिका आणि प्रशासन यांना का समजत नाही ?

‘समस्येवर तोडगा नाही, तर आपत्ती अटळ !’

अशी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ देणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. लोकप्रतिनिधी प्रतिवर्षी या ठिकाणी भेट देऊन आश्वासने देतात; पण येथील कचरा समस्या तशीच आहे !

सोनसोडो (गोवा) कचरा समस्या ही एक आपत्कालीन स्थिती म्हणून हाताळा ! – उच्च न्यायालयाचा निर्देश

या समस्येचा स्फोट होण्यापूर्वी संबंधित यंत्रणांनी यावर तोडगा काढला पाहिजे, असा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिला आहे.

सिंधुदुर्ग : आंबोली धबधबा परिसरात कायदा मोडणार्‍यांवर कारवाई होणार  !

पर्यटकांकडून ‘उपद्रव शुल्क’ वसूल करण्यात येणार आहे. हे शुल्क वसूल करतांना कोणत्याही व्यक्तीने अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर ‘शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला’; म्हणून फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येईल.

हडपसर (पुणे) परिसरात पालखीच्‍या मार्गावर गोळा झालेला कचरा त्‍वरित हटवला !

मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाच्‍या घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाने पालखी प्रस्‍थानानंतर त्‍वरितच कचरा गोळा केला. क्षेत्रीय कार्यालयाच्‍या परिसरातील सोलापूर आणि सासवड महामार्गावर हा कचरा गोळा करण्‍यात आला.

गोवा : कचरा व्यवस्थापन न केल्यावरून न्यायालयाकडून २ पंचायतींना प्रत्येकी ५ लाख रुपये दंड

पंचायतीचा पैसा हा जनतेच्या कराचा पैसा आहे. त्यामुळे हा दंड कचर्‍याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित पंचायतीतील उत्तरदायी पंच, सरपंच यांच्या खिशातून वसूल करावा.

सोनसोडो येथे प्रतिदिन १५ मेट्रीक टन कचर्‍याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा

प्रतिदिन एकूण ३५ टन ओल्या कचर्‍यापैकी प्रशासन प्रतिदिन १५ टन कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारणार, तर उरलेल्या कचऱ्याचे नियोजन कसे करणार ?

गोवा : ढवळी परिसरातील अनधिकृत भंगारअड्डे त्वरित हटवा, अन्यथा रस्त्यावर उतरू !

‘या अनधिकृत भंगारअड्ड्यामुळे मानवी जीविताला मोठा धोका असतांनाही भंगारअड्ड्याचे मालक न्यायालयात धाव घेऊन कारवाईवर तात्पुरती स्थगिती कशी घेऊ शकतात ?’, असा प्रश्न ग्रामस्थांनी ग्रामसभेत उपस्थित केला.

कहां फेके कचरा…?

प्रतिदिन ‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल…’, असे गाणे ऐकवणार्‍या कचरा गाडीने जनतेला स्वच्छतेच्या दृष्टीने बर्‍याच चांगल्या सवयी लावल्या. कचरा इतरत्र फेकू नये, सुका आणि ओला कचरा निराळा करून ठेवावा इत्यादी; पण ही गाडी आता सामान्यांना त्रास देऊ लागली आहे, असे नुकत्याच घडलेल्या प्रसंगातून लक्षात येते.