नगर येथील आरोग्य विभागातील औषधाच्या साठ्याभोवती कचर्‍याचा ढीग

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात औषधे ठेवण्यास जागा नसल्याने या इमारतींच्या जवळील बॅडमिंटन हॉलचा वापर काही वर्षांपासून औषधे ठेवण्यासाठी केला जातो; मात्र सध्या या औषध साठ्याला सर्व बाजूंनी कचर्‍याच्या ढिगाने वेढले आहे.

‘इको ब्रिस्क’चा वापर करून प्लास्टिकच्या कचर्‍याची योग्य विल्हेवाट ! – सुधीर गोरे, सामाजिक कार्यकर्ते

घरात असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या एका प्लास्टिकच्या बाटलीत भरून त्याची ‘इको ब्रिस्क’ सिद्ध करण्याची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते आणि निसर्गमित्र श्री. सुधीर गोरे राबवत आहेत

सांगलीच्या सरकारी घाटावर महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम, १ टन कचरा गोळा

सांगलीच्या कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबवली. यात घाटाच्या परिसरातून १ टन कचरा गोळा करण्यात आला. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही मोहीम राबवण्यात आली.

रस्त्यावर कचरा टाकणारे आणि थुंकणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई ! – कोल्हापूर महानगरपालिकेचा निर्णय

रस्त्यावर कचरा टाकणारे तसेच थुंकणारे यांच्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रस्त्यावर कचरा टाकल्याचे आढळल्यास जागेवरच १५० रुपये, तर थुंकल्यास १०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

मोठ्या शहरांमधील असुरक्षित वातावरण, तसेच तेथे वाढत चाललेले रज-तमाचे प्राबल्य यांमुळे कुटुंबियांसह गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करा आणि तेथे रहाण्याची व्यवस्था करून ठेवा !

शहरांमधील बेसुमार गर्दी, स्वच्छतेचा अभाव, वाढते प्रदूषण, रज-तम यांचे अधिक प्राबल्य आदींमुळे तेथील नागरिक भीती आणि असुरक्षितता यांच्या सावटाखाली वावरतांना दिसत आहेत. युद्धजन्य परिस्थिती, दंगली, त्सुनामी, रोगराई आदी आपत्तींच्या वेळी ही शहरे गावापेक्षा अधिक संकटात असू शकतात. त्यामुळे तेथे रहाणे धोक्याचे ठरू शकते.