सोनगाव (सातारा) येथील कचरा डेपोच्या आगीच्या धुरामुळे अस्वस्थ झालेल्या ग्रामस्थांनी घंटागाड्या रोखल्या

शहरापासून जवळच असणार्‍या सोनगाव हद्दीतील पालिकेच्या कचरा डेपोला आग लावल्याने संपूर्ण सोनगाव आणि जकातवाडी परिसरात धुराचे लोट पसरले. धुराने अस्वस्थ झालेल्या नागरिकांनी घंटागाड्या रोखून धरल्या.

कागल नगरपरिषदेचा सांगली महापालिकेच्या महापौरांसह अभ्यास दौरा !

कागल नगरपरिषदेकडून त्यांच्या प्रकल्पांची माहिती घेऊन यातील सांगलीत काय राबवता येईल याची चर्चाही करण्यात आली.

ओल्या आणि सुक्या कचर्‍याच्या वर्गीकरणामुळे प्रतिदिनचा २ सहस्र मेट्रिक टन कचरा अल्प झाला ! – मुंबई महानगरपालिकेचा दावा

ओल्या आणि सुक्या कचर्‍याच्या वर्गीकरणाला चालना दिल्यामुळे मागील ६ मासांपासून प्रतिदिनचा कचरा साडेनऊ सहस्र मेट्रिक टनवरून ७ सहस्र मेट्रिक टनवर आल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.

मुंबईत कचरा उचलणार्‍या गाड्या अल्प केल्यामुळेे ऐन दिवाळीत घाणीचे साम्राज्य

महापालिका प्रशासनाने कचरा उचलणार्‍या २० टक्के गाड्या अचानक न्यून केल्यामुळे मुंबईत ऐन दिवाळीत ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे, असा आरोप शिवसेनेसह सर्वपक्षियांनी प्रशासनावर केला.

चारकोप (मुंबई) येथील खारफुटीक्षेत्रामध्ये वारंवार लागत असलेल्या आगीमुळे रहिवासी त्रस्त

कांदिवली (प.) येथील चारकोपच्या सेक्टर-२ मध्ये १ नोव्हेंबरला रात्री १० च्या वेळी खारफुटीमध्ये आग लागली होती. ती कचरा जाळण्यासाठी लावली ?, कि खारफुटी नष्ट करण्यासाठी लावली ?, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. ही आग अनुमाने ५० मीटर परिसरात पसरली होती.

देशातील स्वच्छ राजधानीचा पुरस्कार मिळवणार्‍या मुंबई महानगरपालिकेकडून केवळ ६५ टक्के कचर्‍याचेच वर्गीकरण !

मुंबई येथे प्रतिदिन सिद्ध होणार्‍या अनुमाने ८ सहस्र मेट्रिक टन कचर्‍यापैकी केवळ ६५ टक्के कचर्‍याचेच वर्गीकरण महानगरपालिकेकडून करण्यात येते.

अशाने कधीतरी ‘स्मार्ट सिटी’ निर्माण होईल का ?

‘स्मार्ट सिटी’च्या अंतर्गत सोलापूर स्वच्छ रहावे आणि रहिवाशांना कचरा विघटन करून तो घंटागाडीत टाकण्याची सवय लागावी, यासाठी सर्व कुटुंबांना विनामूल्य कचरापेटी देण्यात येत आहे.

मुंबईत प्लास्टिकच्या बाटल्यांची विल्हेवाटीसाठी ५०० यंत्र लावणार !

प्लास्टिक बाटल्यांची विल्हेवाट लावणे मुंबई महानगरपालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे या बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने ५०० ‘बॉटल क्रशिंग यंत्र’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्याच्या पालिकेच्या आदेशाचे पालन न करणार्‍या सोसायट्यांना अंतिम मुदत !

शहरातील कचर्‍याची अडचण मार्गी लावण्यासाठी गृहनिर्माण वसाहतींतील ओल्या कचर्‍यावर वसाहतीच्याच परिसरात प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने वारंवार कालावधी देत कारवाईचा धाक दाखवूनही अद्याप केवळ १ सहस्र वसाहतींनीच याविषयी कार्यवाहीला आरंभ केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF