मडगाव, १८ ऑक्टोबर (वार्ता.) : मागील काही मासांपासून सोनसोडो कचरा प्रकल्पामध्ये असलेला जैव वैद्यकीय कचरा समस्येचे कारण बनला होता; मात्र आता लवकरच हा जैव वैद्यकीय कचरा सोनसोडो येथून हटवण्यात येणार आहे. तो कचरा उचलण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने दिला आहे.
गेल्या काही मासांपासून या जैव वैद्यकीय कचर्यामध्ये ‘सॅनिटरी नॅपकीन्स’ आणि प्लस्टिक पिशव्या यांचा खच पडला होता. याविषयी मडगाव नागरी संस्थेने कारवाई न केल्याने हा कचरा वाढत असल्याचे म्हटले जात आहे. मडगाव नगरपालिकेने सॅनिटरी कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे ३० लाख रुपयांची थकबाकी भरली नव्हती. त्यामुळे कुंडई येथील आस्थापनाने हा जैव वैद्यकीय कचरा उचलण्यास नकार दिला होता; मात्र नंतर ही समस्या न्यायालयाच्या निदर्शनास आली. हा कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने यावर प्रक्रिया करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता हा कचरा लवकरच उचलला जाणार आहे.
संपादकीय भूमिकाहेही न्यायालयाला का सांगावे लागते ? |