वाशी येथे माघी गणेशोत्‍सवाचे आयोजन

नवी मुंबई – वाशी येथे माघी गणेशोत्‍सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. वाशी येथील श्री विघ्‍नहर्ता गणेश मंदिर ट्रस्‍टच्‍या वतीने सकाळी महाअभिषेक, आरती, भजन, सत्‍यनारायण महापूजा, सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्‍यात आले आहे. मोराज रेसिडेन्‍सी गणेशोत्‍सव मंडळ पामबीचचा राजा यांच्‍या वतीने सांस्‍कृतिक, आध्‍यात्‍मिक कार्यक्रम आणि महाप्रसाद आयोजित करण्‍यात आला आहे. सकाळी ९ वाजता श्री गणेश दुग्‍धाभिषेक, दुपारी १२.३० वाजता गणेश पूजन व नवग्रह पूजन , दुपारी ३.०० वाजताः सहस्र मोदक हवन, संध्‍याकाळी ७.३० वाजताः महाआरती, संध्‍याकाळी ८ वाजताः भजन, ८.३० वाजता महाप्रसाद (भंडारा) लाभ घ्‍यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.