‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या अहवालात महाराष्ट्र १० व्या क्रमांकावर !

महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे. शैक्षणिक दर्जाच्या दृष्टीने महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर आहे, तर शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने राजस्थान देशपातळीवर तिसरा आणि मध्यप्रदेश पाचव्या स्थानावर पोचला आहे. पंजाब राज्याने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

युक्रेनहून आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना सामावून घेता येणार नाही ! – केंद्र सरकार

युद्धामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे २० सहस्र भारतीय विद्यार्थी भारतात परतले आहेत. आम आदमी पक्षाचे नेते सुशील गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून या विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्याची विनंती केली आहे.

डेहराडून (उत्तराखंड) येथील एका शाळेला ‘शुक्रवारी’ अर्धा दिवसाची सुटी देण्याचा प्रयत्न पालकांनी हाणून पाडला !

असे जागृत पालक सर्वत्र हवेत ! उत्तराखंडमधील भाजप सरकारने अशा शाळेच्या व्यवस्थापनाच्या विरोधात कारवाई केली पाहिजे !

किशनगंज (बिहार) येथे १९ शाळा रविवारऐवजी ‘शुक्रवारी’ असतात बंद !

‘देशातील ९० टक्के शाळांमध्ये हिंदू बहुसंख्य असल्याने आता त्यांच्यासाठी पवित्र असलेल्या गुरुवारच्या दिवशी सुटी घोषित करण्याची आवश्यकता आहे’, असे हिंदूंनी आता सांगितले पाहिजे !

बूंदी (राजस्थान) येथील सरकारी शाळेत तिसरी भाषा म्हणून संस्कृत ऐवजी उर्दू शिकवण्यासाठी धर्मांधांची धमकी

‘वरून’ आदेश आल्यामुळे शाळेने संस्कृत शिकवणे केले बंद !
मुख्याध्यापिकेने भीतीपोटी पोलिसांत तक्रार करण्याचे टाळले !

(म्हणे) ‘गोव्यात राष्ट्रीय ख्रिश्‍चन विद्यापिठाची स्थापना करा !’ – तृणमूल काँग्रेसचे खासदार लुईझिन फालेरो यांची राज्यसभेत मागणी

गोव्यात ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराचा इतिहास पाहिल्यास हे विद्यापीठही हिंदूंच्या धर्मांतराचे केंद्र बनणार नाही कशावरून ?

शाळेत येतांना पगडी, कृपाण आणि कडे घालून येऊ नये !

बरेली (उत्तरप्रदेश) ख्रिस्ती मिशनरींच्या शाळेचा शीख विद्यार्थ्यांना आदेश !
पालक आणि शीख संघटना यांच्याकडून विरोध !

गोव्यात नुवे (सालसेत) येथे १० वर्षांच्या मुलाचा अभ्यासाला कंटाळून घरातून पळून जाण्याचा प्रयत्न !

मेकॉलेप्रणित कारकून बनवणारी आणि ताणग्रस्त शिक्षणपद्धत पालटून भारतीय गुरुकुल शिक्षणपद्धत अवलंबणे श्रेयस्कर !

गतवर्षी मातृभाषेतील ८ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या !

राज्यात वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये मराठी माध्यमातील ७ आणि कोकणी माध्यमातील १ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत एका लेखी प्रश्नावर उत्तरादाखल दिली.

शाळांमध्ये भगवद्गीता शिकवण्यात येऊ नये, यासाठी ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ची गुजरात उच्च न्यायालयात याचिका

‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ने याचिकेत म्हटले आहे की, भारतीय संस्कृतीची मूल्ये आणि सिद्धांत, तसेच ज्ञानाची प्रणाली शालेय पाठ्यक्रमात घेतली जाऊ शकते; परंतु त्यामध्ये एका धर्माच्या पवित्र ग्रंथाच्या सिद्धांतांना प्राधान्य देणे कितपत योग्य आहे ?