|
बरेली (उत्तरप्रदेश) – येथे ख्रिस्ती मिशनरींच्या ‘सेंट फ्रान्सिस स्कूल’ या शाळेमध्ये शीख विद्यार्थ्यांना शाळेत येतांना पगडी, कृपाण (लहान चाकू) आणि हातामध्ये कडे घालून येण्यावर बंदी घातली आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने उर्मटपणे म्हटले आहे की, जर या गोष्टी कुणाला घालायच्या असतील, तर ते शाळेतून नाव काढून जाऊ शकतात.
बरेली के सेंट फ्रांसिस स्कूल ने सिख छात्रों के पगड़ी, कृपाण और कड़ा पहनकर आने पर रोक लगा दी है। उस पर सिखों की भावनाएँ आहत करने का आरोप है।https://t.co/Ym76rMLugm
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 21, 2022
१. या प्रकरणी येथील ‘यूथ खालसा’ गटाचे अध्यक्ष मनजीत सिंह बिट्टू यांनी गुरुद्वारामध्ये शीख विद्यार्थ्यांच्या पालकांची बैठक घेतली. नंतर त्यांनी शाळेबाहेर धरणे आंदोलन केले.
२. ‘मॉडल टाऊन गुरुद्वारा कमिटी’चे माजी अध्यक्ष मालिक सिंह कालरा यांनी आरोप केला की, शाळेला विरोध केल्याने शीख विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे कोणतेही पालक उघडपणे विरोध करण्यास पुढे येत नाहीत. कालरा यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर लिसमिन यांना हटवण्याची मागणी केली आहे. अन्य शिखांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे शाळेवर कारवाई करून शाळेला तिचा वरील आदेश मागे घेण्यास भाग पाडण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाअशा शाळांची नोंदणी रहित करून संबंधितांना शिखांच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून कारागृहात टाकले पाहिजे, तरच त्यांच्यावर वचक बसेल ! |