युक्रेनहून आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना सामावून घेता येणार नाही ! – केंद्र सरकार

युक्रेनहून आलेले भारतीय वैद्यकीय विद्यार्थी

नवी देहली – भारतीय चिकित्सा परिषद अधिनियम-१९५६ आणि राष्ट्रीय चिकित्सा आयोग अधिनियम-२०१९ अंतर्गत विदेशात शिक्षण घेणार्‍या वैद्यकीय विद्यार्थ्यांना देशातील महाविद्यालयांत सामावून घेता येऊ शकत नाही. त्यामुळेच युक्रेनमधून मायदेशी परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशातील शिक्षण संस्थांमध्ये सामावून घेण्याची अनुमती दिली गेलेली नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. युद्धामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे २० सहस्र भारतीय विद्यार्थी भारतात परतले आहेत.

आम आदमी पक्षाचे नेते सुशील गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून या विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्याची विनंती केली आहे.