किशनगंज (बिहार) येथे १९ शाळा रविवारऐवजी ‘शुक्रवारी’ असतात बंद !

शाळांमध्ये ८० टक्के मुसलमान विद्यार्थी असल्याने अनेक वर्षांची परंपरा !

किशनगंज (बिहार) – जिल्ह्यातील १९ शाळांमध्ये कोणत्याही सरकारी आदेशाविना ‘शुक्रवार’ची सुटी देण्यात येत आहे. शिक्षण विभागाचे म्हणणे आहे की, हा मुसलमानबहुल भाग असल्याने ही परंपरा चालू झाली आहे.

१. किशनगंज शहरातील लाइन उर्दू मध्य विद्यालयाच्या मुख्याध्यापिका झरना बाला साहा यांनी सांगितले की, ‘शुक्रवार’ची सुटी देण्यात आलेल्यांमध्ये एकही उर्दू शाळा नाही, सर्व हिंदी शाळा आहेत; मात्र शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांची संख्या ८० टक्के आहे. वर्ष १९०१ मध्ये आमची शाळा स्थापन करण्यात आली आहे. तेव्हापासून येथे शुक्रवारी सुटी असते, तर रविवारी शाळा चालू असते.

२. किशनगंज जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सुभाष कुमार गुप्ता यांनी सांगितले की, ही जुनी परंपरा आहे. याविषयी कोणताही आदेश नाही. या संदर्भात आम्ही वरिष्ठ अधिकार्‍यांची चर्चा करून ‘शुक्रवारी’ शाळा चालू ठेवण्याविषयी निर्णय घेऊ.

३. किशनगंजचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी शुक्रवारच्या सुटीला विरोध केला आहे. ते म्हणाले की, शिक्षणापासून धर्म आणि जात वेगळे ठेवले पाहिजे.

संपादकीय भूमिका

  • ‘देशातील ९० टक्के शाळांमध्ये हिंदू बहुसंख्य असल्याने आता त्यांच्यासाठी पवित्र असलेल्या गुरुवारच्या दिवशी सुटी घोषित करण्याची आवश्यकता आहे’, असे हिंदूंनी आता सांगितले पाहिजे !
  • हिंदू बहुसंख्य असतांनाही त्यांनी गेल्या ७५ वर्षांत धर्माच्या आधारे असा कुठेही निर्णय घेतला नाही. तथापि जेथे मुसलमान बहुसंख्य आहेत, तेथे मात्र लगेच त्यांच्या धर्मानुसार असा निर्णय घेतला जातो, हे हिंदू लक्षात घेतील तो सुदिन !
  • हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्व सरकरांना लज्जास्पद !