दहावी आणि बारावीची ‘ऑफलाईन’ परीक्षा रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

दहावी आणि बारावीची ‘ऑफलाईन’ परीक्षा रहित करण्यास नकार देत या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर विभागीय चौकशी चालू असतांनाही अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार !

सहसंचालक दर्जाच्या अधिकार्‍याकडे आयुक्तपदाचा अथवा अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देऊ नये त्यामुळे कामावर नियंत्रण रहात नाही, असा संकेत आहे; मात्र सुपे यांची नियुक्ती करतांना हा संकेत पाळला गेलेला नाही.

नगर येथे दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणार्‍या टेम्पोला आग लागून प्रश्नपत्रिका भस्मसात् !

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची मध्यप्रदेशातील भोपाळ येथे छपाई करून, त्या पुणे येथील बोर्डाच्या कार्यालयात पोच करण्यासाठी टेम्पोमधून नेल्या जात होत्या.

वैज्ञानिक संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत ! – डॉ. नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु

विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा अंतर्भाव असलेली ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क’ ही याकरीता उपयुक्त असून वैज्ञानिक संशोधन करतांना विद्यार्थ्यांमध्ये त्याबद्दलची आवड, संयम आणि सातत्य असणे आवश्यक आहे,

युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले भारतीय विद्यार्थी भारतात परतले !

रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मायदेशी परतले

मदरशांमधील धार्मिक शिक्षण बंद करण्याचा आसाम सरकारचा धाडसी निर्णय !

अनेक धर्मांध आरोपी, आतंकवादी आणि जिहादी यांनी पोलिसांना दिलेले जबाब वाचले पाहिजेत. त्यांच्या जिहादी कृत्यांमागे त्यांना मिळत असलेले धर्मशिक्षण हेच कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.

मदरसा आणि वैदिक पाठशाळा यांना शिक्षण अधिकार कायद्याच्या अखत्यारीत आणावे ! – देहली उच्च न्यायालयात याचिका

‘शिक्षण अधिकार कायद्याच्या विविध कलमांमुळे मदरसा आणि वैदिक शाळा, तसेच धार्मिक शिक्षण देणार्‍या शैक्षणिक संस्थावर अन्याय होतो अशा संस्थांना शिक्षण अधिकार कायद्याखाली आणले पाहिजे.

शाळांमध्ये कोणतेही धार्मिक चिन्ह किंवा वस्तू यांचा प्रचार करू नये ! – कंगना राणावत, अभिनेत्री

शाळांमध्ये कोणत्याही धार्मिक चिन्हाचा किंवा वस्तूचा प्रचार करू नये, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना राणावत यांनी हिजाबविषयी वृत्तवाहिनीवरील एका मुलाखतीत व्यक्त केली.

जी.ए. सॉफ्टवेअरचे संस्थापक गणेशन् यांना अश्विनकुमार यांनी दिले २ कोटी रुपये !

शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र करणारे संचालक अश्विनीकुमार यांनी जी.ए. सॉफ्टवेअरचे संस्थापक गणेशन यांना २ कोटी रुपये दिल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

शाळेच्या दुरुस्तीसाठी सांगेली ग्रामस्थांचे आज सावंतवाडीत उपोषण

शाळेचे छप्पर तुटून विद्यार्थ्यांची जीवितहानी होऊ शकते, एवढेही गांभीर्य प्रशासनाला कसे नाही ? शाळेच्या छप्पराच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांना उपोषण करावे लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद !