दहावी आणि बारावीची ‘ऑफलाईन’ परीक्षा रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – दहावी आणि बारावीची ‘ऑफलाईन’ परीक्षा रहित करण्यास नकार देत या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, ही याचिका अनावश्यक असून यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होईल.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सेंट्रल बोर्ड ऑफ सेंकडरी एज्युकेशन) आणि राज्यांचे शिक्षण मंडळ हे या परीक्षा कशा घ्याव्यात, यासंदर्भात सर्व पैलूंचा अभ्यास करून निर्णय घेतील. सदर याचिका प्रविष्ट करून चुकीचा पायंडा पाडला जात आहे, अशा शब्दांत न्यायालयाने याचिकाकर्त्याला सुनावले.