मुंबई – मुलांच्या शिक्षणासाठी हिजाबपेक्षा पुस्तके महत्त्वाची आहे. शाळेत ‘जय माता दी’चा दुपट्टा किंवा बुरखा यांपैकी काहीही घालू शकत नाही. गणवेशाचा आदर करणे महत्त्वाचे आहे. शाळांमध्ये कोणत्याही धार्मिक चिन्हाचा किंवा वस्तूचा प्रचार करू नये, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना राणावत यांनी हिजाबविषयी वृत्तवाहिनीवरील एका मुलाखतीत व्यक्त केली.
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘पुस्तकाचे स्थान हिजाबपेक्षा वर आहे. मुलांचे शिक्षण अधिक महत्त्वाचे आहे. तुम्ही शाळेत गेलात की, तिथे तुम्हाला गणवेश दिला जातो. गणवेश हा एक ‘कोड’ असतो. तो सगळ्यांसाठी सारखाच असायला हवा. गणवेश दिला की गरीब-श्रीमंत, हिंदु-मुसलमान सगळे एकत्र येतात.’’