घारगाव (जि. नगर) – संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटामध्ये एका टेम्पोने पाठीमागच्या बाजूने अचानक पेट घेतला. या आगीमध्ये टेम्पो आणि टेम्पोतील पुणे बोर्डाच्या सर्व १० वी आणि १२ वीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या आहेत.
बापरे! बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आगीत जळून खाक! https://t.co/yIamEd98HV@EduMinOfIndia @mybmcedu#tempo #HSC #questionpaper #transportation #tempo #fire
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) February 24, 2022
संगमनेर साखर कारखाना आणि नगरपरिषदेचे अग्नीशामक बंब घटनास्थळी पोचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. टेम्पोतील प्रश्नपत्रिका जळाल्याची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी तातडीने घटनास्थळी उपस्थित झाले होते.
४ मार्चपासून चालू होणार्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची मध्यप्रदेशातील भोपाळ येथे छपाई करून, त्या पुणे येथील बोर्डाच्या कार्यालयात पोच करण्यासाठी टेम्पोमधून नेल्या जात होत्या.