शस्‍त्रविहीनतेचे षड्‍यंत्र !

गोरक्षक बिट्टू बजरंगी

हिंदूंच्‍या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर आक्रमण केल्‍याच्‍या प्रकरणी हरियाणा पोलिसांनी गोरक्षक बिट्टू बजरंगी यांना अटक केली. त्‍यांच्‍या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल प्रविष्‍ट करण्‍यात आला आहे. ‘यात्रेमध्‍ये शस्‍त्र बाळगण्‍याची अनुमती नसतांना बिट्टू यांसह अन्‍य १५ ते २० जणांनी ‘त्रिशूळ’ आणि ‘तलवार’ अशी ‘प्राणघातक शस्‍त्रे’ बाळगली होती’, अशी आवई पोलिसांनी त्‍यात उठवली आहे. कुणीही उठायचे आणि हिंदु, तसेच हिंदु धर्म यांवर आरोप करत सुटायचे, ही रित बनली आहे. ‘हिंदूंच्‍या संदर्भात काहीही गरळओक केली, तरी चालते. कोणताही हिंदु याविरोधात आवाज उठवत नाही’, हे सगळ्‍यांना चांगलेच ठाऊक झाले आहे. यात्रेमध्‍ये शस्‍त्र बाळगण्‍याची अनुमती नव्‍हती, हे जरी खरे असले, तरी धर्मांध मुसलमानांनी प्राणघातक आक्रमण केलेच ना ! मग हिंदूंनी त्‍यात स्‍वतःचा बळी द्यायचा का ? ‘धर्मांधांच्‍या भयावह आक्रमणाचा प्रतिकार करण्‍यासाठी हिंदूंनी स्‍वतःकडे एखादे शस्‍त्र का बरे बाळगू नये ?’, हा प्रश्‍न अनुत्तरित रहातो. धर्मांधांच्‍या आतापर्यंतच्‍या हिंसक आक्रमणांचा इतिहास पाहिला, तर हिंदू काय दगड, काठ्या इतकेच घेऊन स्‍वतःचे रक्षण करणार का ? एवढ्याशा वस्‍तूंनी काय साध्‍य होणार ? ‘स्‍वतःचे रक्षण करण्‍याचे स्‍वातंत्र्य निधर्मी देशातील राज्‍यघटनेने हिंदूंनाही दिले आहे’, हे पोलिसांनी लक्षात ठेवावे. ‘हिंदूंच्‍या यात्रेवर का आक्रमण केले ?’ याविषयी धर्मांधांना ना कुणी खडसावत आहे, ना त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करत आहे ! हिंदूंवर मात्र कधीही, कुठेही आणि कशीही दादागिरी करण्‍याचा अधिकारच जणू मिळाला आहे, अशा आविर्भावात पोलीस हिंदूंच्‍या संदर्भात प्रत्‍येक वेळी मर्दुमकी गाजवत असतात; पण त्‍यांनी लक्षात ठेवावे की, हिंदू त्‍यांना बळी पडणार नाहीत. हे आता थांबायलाच हवे. हिंदुद्वेष्‍ट्यांनी हिंदूंच्‍या सहनशीलतेचा अंत पाहू नये. हिंदूंना आता कुणी इतकेही षंढ आणि अस्‍मिताविहीन समजू नये. प्रत्‍येक हिंदु आता धर्माविषयी सजग, सतर्क होत चालला आहे. हे हिंदूंच्‍या भविष्‍याच्‍या दृष्‍टीने आशादायी आहे.

वर्ष २०२१ मध्‍ये आसाममध्‍ये धर्मांतरित ख्रिस्‍त्‍यांनी हिंदूंच्‍या प्राचीन धार्मिक स्‍थळांवरील शिवलिंग आणि त्रिशूळ उपटले होते. गेल्‍या १०० वर्षांहून अधिक काळ हिंदू तेथे शिवलिंगाची पूजा करत होते; पण तेथे पूजा न करण्‍याची धमकीही ख्रिस्‍त्‍यांनी हिंदूंना दिली होती. त्रिशुळाच्‍या विरोधातील हरियाणा आणि आसाम या २ घटनांकडे हिंदूंनी गांभीर्याने पहावे.

हिंदु धर्माला संपवण्‍याचे कारस्‍थान !

हिंदूंच्‍या शस्‍त्रांना होणारा विरोध म्‍हणून हिंदु धर्माला शस्‍त्रांच्‍या रूपात लाभलेली दैवी परंपरा, तेज, ओज नष्‍ट करण्‍याचे रचले जाणारे षड्‍यंत्रच होय ! हिंदूंना शस्‍त्रविहीन करून नेस्‍तनाबूत करण्‍याचाच हा प्रयत्न आहे. ‘अशा माध्‍यमांतून हिंदु धर्माला संपवण्‍याचेच कारस्‍थान रचले जात आहे’, असे म्‍हटल्‍यास वावगे ठरणार नाही. ‘याचे कारण हिंदूंमधील सहिष्‍णुता आहे’, हे हिंदूंनी लक्षात घ्‍यायला हवे. ‘हिंदू बाळगत असलेली शस्‍त्रे मुसलमानांच्‍या विरोधात वापरतात’, असा कांगावा करत त्‍या शस्‍त्रांना विरोध केला जातो. ती शस्‍त्रे एकप्रकारे म्‍यान करण्‍याचा प्रयत्न केला जातो. विशेष म्‍हणजे हा विरोध भाजप सरकार असणार्‍या हरियाणा राज्‍यात केला जाणे, हे दुर्दैवीच म्‍हणावे लागेल. अशा हिंदुद्वेष्‍ट्या पोलिसांवर भाजप सरकारने कारवाई करावी. अन्‍यथा आज प्राणघातक शस्‍त्र ठरणारे त्रिशूळ उद्या सर्वत्रच्‍या शिवमंदिरांतूनही काढण्‍यास हे हिंदुद्वेषी पोलीस मागे-पुढे पहाणार नाहीत.

हिंदूंचे प्रत्‍येक शस्‍त्र हे देवतांशी निगडित असते. त्रिशूळ हे शस्‍त्र दत्त आणि शिव या देवतांच्‍या हाती असते. त्रिशुळाला ‘प्राणघातक शस्‍त्र’ म्‍हणणे हा हिंदूंच्‍या देवतांचा अवमानच आहे. तो करणार्‍या पोलिसांना हिंदूंनी वेळीच खडसावायला हवे; कारण अन्‍य धर्मियांच्‍या श्रद्धास्‍थानांच्‍या विरोधात ‘ब्र’ही काढण्‍याचा विचार यांच्‍या मनात येत नाही आणि हिंदूंविषयी बेलगामपणे बोलणे अन् वर्तन केले जाते. ‘हिंदूबहुल देशातील सरकार अशांवर कठोर कारवाई कधी करणार ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्‍या मनात प्रत्‍येक धर्मविरोधी आघातानंतर निर्माण होतो. सरकार याचे उत्तर देईल का ? कोलकाता (बंगाल) येथे वर्ष २०२२ मध्‍ये नवरात्रोत्‍सवाच्‍या कालावधीत श्री दुर्गादेवीला वेश्‍याव्‍यवसाय करणार्‍या महिलेच्‍या रूपात दाखवण्‍यात आले होते. या वेळी तिच्‍या हातात एकही शस्‍त्र दाखवले नव्‍हते. हा देवीचा अवमानच आहे. ही घटना पहाता हिंदूंना शस्‍त्रविहीन करण्‍याची पावले उचलली जाऊ लागली आहेत. ही स्‍थिती म्‍हणजे हिंदूंसाठी धोक्‍याची घंटाच आहे.

हिंदूंवर दबाव; उदात्तीकरण मात्र मुसलमानांचे !

हिंदूंनी शस्‍त्र बाळगल्‍यावर त्‍याकडे बोट दाखवले जाते, मग धर्मांध मुसलमान उघडपणे दिवसाढवळ्‍या तलवारी, बंदुका घेऊन रस्‍त्‍यांवरून फिरतात, नागरिकांच्‍या हत्‍या करतात, त्‍या वेळी त्‍यांच्‍या शस्‍त्रांना का विरोध केला जात नाही ? विरोध न करण्‍यामुळे कायदा-सुव्‍यवस्‍थेला बिघडवणार्‍या ‘तलवार गँग’चे प्रत्‍येक वेळी उदात्तीकरण होत असते. ‘मोहरम’च्‍या वेळी मातमच्‍या कालावधीत मुसलमान स्‍वतःला शस्‍त्राने इजा करून घेतात. मग त्‍यांनी केलेला हा प्रकार कसा काय चालतो ? त्‍यांच्‍या या प्रकाराला विरोध करण्‍याचे कुणाचे धाडस होत नाही, हेच खरे ! ‘कायदा-सुव्‍यवस्‍थेचे रक्षक’ म्‍हणवले जाणार्‍या पोलिसांना हे लज्‍जास्‍पदच होय. हिंदूंकडील शस्‍त्रांना विरोध करणार्‍या पोलिसांनी ‘धर्मांध मुसलमानांच्‍या हिंसक टोळ्‍यांना कधी आळा घालणार ?’, ते सांगावे.

ब्रिटिशांनी हिंदूंना शस्‍त्रविहीन केले. ‘स्‍वतःच्‍या राजवटीला विरोध होऊ नये, हिंदूंनी षंढ बनावे’, हे त्‍यामागील कारण होते. याच पार्श्‍वभूमीवर त्रिशुळाला होणारा विरोध पहाता भविष्‍यात हिंदूंच्‍या शस्‍त्रांची आणखी विटंबना होऊ नये, यासाठी हिंदूंनीही संघटित होण्‍याची वेळ आता आली आहे. यासाठी हिंदूंनीच पावले उचलली पाहिजेत.

हिंदूंकडील शस्‍त्रांना विरोध करणारे पोलीस धर्मांध मुसलमानांच्‍या हिंसक टोळ्‍यांना कधी आळा घालणार ?