तिजोरीची छिद्रे बंद करा !

योजनांवरील निधी जोपर्यंत भ्रष्‍टाचार्‍यांच्‍या खिशात जात आहे, तोपर्यंत अर्थसंकल्‍पाचा उद्देश पूर्ण कसा होणार ?

खलिस्तानवाद्यांचा बीमोड !

इस्लाममधील त्रुटी वैचारिक स्तरावर पुढे आल्यावर आज जगभरातून त्याला विरोध होत आहे. ज्याप्रमाणेच खलिस्तानवादी चळवळ मुत्सद्देगिरीने कडक धोरण अवलंबून मोडून काढली पाहिजे, त्याचसमवेत येथील शिखांमध्येही वैचारिक प्रबोधन केले पाहिजे !

दरिद्री पाक आणि भारताची भूमिका !

भविष्यवेत्त्यांनी ‘पाकचे ४ तुकडे होणार’, असे सांगितल्याने तो त्याच्या कर्मांनी मरेलच. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची स्थिती चांगली असल्याने त्याची कठोर भूमिकाही स्वीकारार्ह होईल. त्यामुळे याप्रसंगी भारताने सावध, चाणाक्ष आणि कर्तव्यकठोर भूमिका घेतल्यास भारताच्या सुरक्षित भविष्यासाठी ती महत्त्वाची ठरेल !

हिंदु राष्ट्राच्या दिशेने…!

आज कैराना, कन्याकुमारी, काश्मीर आदी ठिकाणांहून हिंदूंचे विस्थापन होत असतांना, तसेच हिंदु मुली, हिंदूंची भूमी, हिंदूंची मंदिरे, हिंदूंचे गोधन, हिंदू नेते आदी काहीच सुरक्षित नसतांना या सार्‍यांपासून वाचण्यासाठी आता सनातन धर्मीय (हिंदु) राष्ट्राची आवश्यकता हिंदूंना वाटली, तर त्यात चुकीचे काय ?

पुरस्‍काराचा मान !

यावर्षी चांगल्‍या व्‍यक्‍तींना पुरस्‍कार दिल्‍याचा आनंद जरी असला, तरी राष्‍ट्रघातकी आणि राष्‍ट्र किंवा समाज यांप्रती काहीही भरीव कामगिरी न करणारे लोक यांचा गौरव होणे, हे सामान्‍य जनतेच्‍या पचनी न पडणारे ! त्यातल्या त्यात अध्‍यात्‍मक्षेत्रातील व्‍यक्‍तींना ‘पद्म पुरस्‍कार’ मिळणे, ही येत्‍या काळातील देशातील आध्‍यात्मिक वातावरणाची नांदी !

‘मराठी’ लोप पावलेली साहित्‍य संमेलने !

ज्‍या संमेलनांमध्‍ये श्री सरस्‍वतीदेवीलाच नाकारले जात असेल, तेथे मराठीच्‍या उत्‍कर्षाची अपेक्षा काय ठेवणार ? तसे मंथन या संमेलनातून घडण्‍यासाठी सारस्‍वतांना श्री गणेश आणि श्री सरस्‍वतीदेवी सद़्‍बुद्धी देवो, हीच प्रार्थना !

राष्‍ट्रघातकी काँग्रेस !

आताही राहुल गांधी यांच्‍या बहुचर्चित ‘भारत जोडो’ यात्रेत दिग्‍विजय सिंह यांनी ‘केंद्र सरकारने ‘सर्जिकल स्‍ट्राईक’चे पुरावे कधीच दिले नाहीत’, असे राष्‍ट्रघातकी विधान केले.

ऐतिहासिक पाऊल !

येत्‍या २६ जानेवारीला असणार्‍या प्रजासत्ताकदिनाच्‍या पार्श्‍वभूमीवर २३ जानेवारी या दिवशी पंतप्रधानांनी नवा ऐतिहासिक प्रारंभ केला आहे. हे लक्षात घेऊन राष्‍ट्राचे सार्वभौमत्‍व आणि अखंडता यांच्‍या रक्षणासाठी भारतियांनीही आता कृतीशील व्‍हायला हवे.

गोवा : आध्‍यात्मिक केंद्र !

‘आध्‍यात्मिक केंद्र !’ बनवण्यासाठी धार्मिक संस्‍था, संप्रदाय यांचेही साहाय्‍य घेण्‍यासाठी सरकारने प्रयत्न करावा. त्‍त्‍याचा आध्‍यात्मिक स्‍तरावर देशातील प्रत्‍येक हिंदूला लाभ होईल. गोव्‍याची होत असलेली अपकीर्ती पुसून गोव्‍याची खरी ओळख देशाला आणि जगाला समजेल.

हॉकीची ऐशी-तैशी !

भारतातील एकही आस्‍थापन हॉकीसाठी पुढे का येत नाही ? हॉकीच्‍या खेळाडूंना स्‍वत:चा ‘ब्रँड अ‍ॅम्‍बॅसेडर’ बनण्‍यासाठी किती आस्‍थापने आमंत्रित करतात ? एकूणच हॉकीच्‍या प्रोत्‍साहनार्थ संपूर्ण व्‍यवस्‍थेने भगीरथ प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, हे मात्र खरे !