(म्हणे) ‘मोगल येथे लुटायला नव्हे, तर घर बनवण्यासाठी आले होते !’ – नसिरुद्दीन शहा

मोगल येथे घर बनवण्यासाठी आले, तर सहस्रावधी मंदिरे उद्ध्वस्त करणे, लक्षावधी हिंदूंच्या हत्या, हिंदु स्त्रियांवर बलात्कार आणि त्यांची विक्री आदी गोष्टी दीड सहस्र वर्षे का केल्या ? हे नसिरुद्दीन शहा यांनी सांगावे !

सह्याद्री प्रतिष्ठानने दाभोळ बंदरातील तोफांच्या संवर्धनाची केली मागणी

अशी मागणी प्रशासनाकडे का करावी लागते ? खरेतर प्रशासनानेच अशा ऐतिहासिक वस्तूंचे जतन करायला हवे !

ऐतिहासिक आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकान !

आग्वाद किल्ल्याला देशी आणि विदेशी नागरिक भेट देऊन स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वहातात; मात्र अशा ‘ऐतिहासिक किल्ल्यावर मद्याची विक्री करणार्‍या दुकानाला शासनाने अनुज्ञप्ती कशी दिली ?’

मदनी यांची चिथावणी !

‘धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार करायचे आणि हिंदूंनी ते सहन करायचे अन् पुन्हा त्यांच्याशी गुण्यागोविंदाने रहायचे, ‘हिंदू हे भोळे, सर्वधर्मसमभावी, सहिष्णु आहेत, जातीजातींमध्ये भांडतील; पण शत्रूविरुद्ध एक होणार नाहीत’, ही लक्षणे धर्मांधांनी पुरती ओळखली आहेत. त्यामुळे ते बिनभोबाट काहीही विधाने करतात.

विदेशी आक्रमकांनी शहरांना दिलेली नावे पालटा !

वास्तविक अशी याचिका प्रविष्ट करण्याची वेळ येऊ नये. सरकारने याविषयी देशव्यापी मोहीम हाती घेऊन शहरे आणि गावे यांना असलेले मूळ नाव देण्यासाठी कृती करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !

(म्हणे) ‘औरंगजेबाने बांधलेल्या महालाचे सुशोभिकरण करा !’

अशा नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही कारवाई करणार नाही, उलट अशांना विरोध करणार्‍यांना ‘मुसलमानविरोधी’ ठरवेल, हे लक्षात घ्या आणि अशा पक्षाला निवडणुकीत त्याची जागा दाखवून द्या !

लखनौचे लवकरच नामांतर होणार !

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी राज्याची राजधानी लखनौचे नामांतर करण्याविषयी विधान केले आहे. येथे पत्रकारांशी बोलतांना पाठक म्हणाले की, लखनौविषयी सर्वांना ठाऊक आहे की, ते लक्ष्मणाचे शहर आहे. त्यामुळे सरकार लवकरच या शहराचे नामांतर करणार आहे.

‘सेतूसमुद्रम्’ प्रकल्‍प रोखा !

‘केंद्रशासनाने रामसेतूला राष्‍ट्रीय स्‍मारक घोषित करण्यास विलंब केला, तर ज्‍याप्रमाणे राममंदिराच्‍या बांधकामासाठी हिंदूंना रस्‍त्‍यावर उतरावे लागले होते, तोच भाग रामभक्‍तांंना येथेही करावा लागेल. असे होण्‍यापेक्षा केंद्राने रामसेतूला हानी पोचवू शकणार्‍या या प्रकल्‍पालाच पूर्णविराम देऊन हिंदूंच्‍या धर्मश्रद्धा जपाव्‍यात, हीच अपेक्षा !

तमिळनाडू विधानसभेत ‘सेतूसमुद्रम्’ प्रकल्पाच्या समर्थनार्थ ठराव संमत !

नास्तिकतावादी आणि हिंदुद्वेषी द्रमुक सरकार हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा काँग्रेसप्रमाणेच राजकीय नाश झाल्याविना रहाणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे !

‘फ्रंटिस पीस ऑफ सांकवाळ’ या संरक्षित जागेतील अवैध कृत्ये रोखा !

अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व विभाग  स्वतःहून संरक्षित जागेतील अवैधता का रोखत नाही ? त्यांचे संबंधितांशी साटेलोटे आहे का ?