वादग्रस्त विनोदी कलाकार वीर दास यांचा बेंगळुरू येथील कार्यक्रम रहित !

हिंदूंच्या संघटित लढ्याचा परिणाम !

राजनांदगाव (छत्तीसगड) येथे बौद्धांच्या कार्यक्रमात हिंदूंच्या देवतांची पूजा न करण्याची देण्यात आली शपथ !

राजनांदगावच्या काँग्रेसच्या महापौर हेमा देशमुख यांची उपस्थिती

गीतोपदेशाची ‘जिहाद’शी तुलना : अतार्किक आणि काँग्रेसवरच उलटण्याची शक्यता अधिक !

समर्थ रामदासस्वामी म्हणतात तसे –
‘समूळ ग्रंथ पहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । गुण सांगतां अवगुण । पाहे तो येक पढतमूर्ख ॥’ अशीच लक्षणे या हिंदुद्वेष्ट्या पढतमूर्ख चाकूरकरांची व्यथा अन् कथा !

देहलीतील आपचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत हिंदु देवतांची पूजा न करण्याची शपथ

आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांचे हिंदुद्वेषी कृत्य !

‘आदिपुरुष’ चित्रपटाला प्रदर्शित होऊ देणार नाही ! – विहिंपची चेतावणी

संभल (उत्तरप्रदेश) येथील विहिंपचे विभाग प्रचार प्रमुख अजय शर्मा यांनी म्हटले की, चित्रपटांमध्ये हिंदूंच्या आदर्शांना चुकीच्या पद्धतीने दाखवणे ही धर्माची थट्टा आहे.

गरब्यामध्ये ‘अली मौला’ गाणे गाण्याचा प्रयत्न करणार्‍या हिमेश रेशमिया यांना हिंदु संघटनांनी हाकलले !

‘हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी कोणते गाणे गायचे ?’, हेही ठाऊक नसणारे हिंदु गायक ! रेशमिया यांची ही कृती म्हणजे धर्मशिक्षणाचा अभाव आणि आत्मघाती धर्मनिरपेक्षता याचेच दर्शक आहे !

कोलकाता येथील नवरात्रोत्सव मंडपातील श्रीदुर्गादेवीला वेश्येच्या रूपात दाखवले !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांची होत असलेल्या अधोगती ! हिंदूंनी यास वैध मार्गाने विरोध करणे अपेक्षित आहे !

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मंदिर परिसरात चपला घालून केला प्रवेश !

मंदिरात चपला घालून जाऊ नये, हे ठाऊक असतांनाही अशा प्रकारची कृती केल्याच्या प्रकरणी तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !

ख्रिस्त्यांचे उदात्तीकरण का ?

देवीच्या मंडपात शिरतांना समोर चर्चच्या केंद्राची प्रतिकृती दिसत असेल, तर भाविकांच्या मनात देवीविषयीचे प्रेम, तिची भक्ती, भक्तीचा जागर यांच्याविषयीचे विचार तरी कुठून येणार ? उलट त्यांचे ख्रिस्तीप्रेमच उफाळून येईल. आयोजकांनाही हेच हवे आहे ना ? यातूनच यात सहभागी असणाऱ्या सर्वांच्या धर्माभिमानशून्यतेची प्रचीती येते !

छत्तीसगडच्या बालाजी मंदिरात आयोजित केलेला ‘फॅशन शो’ बजरंग दलाने उधळला !

हिंदूंना स्वतःचा धर्म, तसेच ‘धर्मस्थळांचे पावित्र्य कसे राखावे ?’, याचे ज्ञान नसल्याने ते अशा प्रकारची धर्मद्रोही कृती करतात आणि देवाच्या अवकृपेला पात्र होतात ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याला पर्याय नाही !