|

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारत आणि पाकिस्तान यांची जी फाळणी झाली, त्यासाठी महंमद अली जिना नाही, तर हिंदु महासभा उत्तरदायी होती. हिंदु राष्ट्राची मागणी करणारे लोक हे देशाचे शत्रू आहेत, असे अश्लाघ्य वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे. उत्तरप्रदेशातील बांदा येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.
१. मौर्य पुढे म्हणाले की, भारताची घटना हे सांगते की, धर्म, जात, लिंग आणि जन्मस्थळ यांच्या आधारे कुठलाही भेदभाव करता येत नाही. जर कुणी ‘हिंदु राष्ट्र हवे’, अशी मागणी करत असेल, तर दुसरे लोकही तशी मागणी करणार नाहीत का ? याआधी हिंदु महासभेने हिंदु राष्ट्राची मागणी केली होती. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाली. (भारताची फाळजी ही जिना आणि गांधी यांच्यामुळे झाली. हे सत्य नाकारणारे इतिहासद्रोहीच होय ! – संपादक)
२. याआधीही मौर्य यांनी हिंदुद्रोही वक्तव्य केली होती. ऑगस्ट २०२३ मध्ये मौर्य म्हणाले होते की, हिंदू हा कुठलाही धर्म नाही, तर तो केवळ एक धोका आहे. ब्राह्मणवादाची मुळे खूप खोलवर रुजली आहेत. समाजातील असमानतेचे कारण ब्राह्मणवाद आहे.
संपादकीय भूमिका
|
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
संसदेचे कामकाज गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित
MP UCC Bill : मध्यप्रदेशाच्या मंत्रीमंडळाची समान नागरी कायद्याला संमती
‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेवर जाणारा मोर्चा हिंसक : पोलिसांनी लाठीमार करून पांगवले
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवरील २३ दिवसांचे बेमुदत उपोषण मागे